HomeनांदेडShri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या...

Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी ठोस पावले उचलली आहेत. मंदिराला सध्या प्राप्त असलेला ‘क’ दर्जा वाढवून ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पत्र देत सातत्याने पाठपुरावा सुरू केल्याची माहिती बुधवारी आयोजित शंकर पट स्पर्धेच्या उदघाटन मंचावरून बोलतांना दिली आहे.श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्यास भाविकांसाठी मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

हिमायतनगर भोकर, नांदेड हायवे लगत असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण जागेत सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्याचा मानस असून, चिमुकल्या बालकांपासून ते वयोवृद्ध मायमाऊलींना विरंगुळा मिळावा यासाठी भव्य उद्यान उभारण्याचाही प्रस्ताव महावीरसेठ यांनी मांडला आहे. याशिवाय परमेश्वर मंदिराला ब दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनाच्या विविध योजनांतून टप्प्याटप्प्याने सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन आमदार कोहळीकर यांनी दिले.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बैलगाडा शर्यतीचा थरार बुधवारी श्री परमेश्वर मंदिर यात्रेत अनुभवायला मिळाला. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक शंकरपट स्पर्धेस नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. लेझिम ताल सुरु, ढोल-ताशांच्या गजरात मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि तहसील कार्यालयाजवळील मैदानात स्पर्धेचे जल्लोषपूर्ण उद्घाटन आमदार कोहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

shankar 2 Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

यावेळी मंदिर कमेटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, माजी बांधकाम सभापती प्रताप देशमूख सरसमकर, शंकर पट समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैलगाडा शर्यत ही ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असून, या परंपरेचे जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

shankar 1 Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

नांदेड जिल्ह्यासह विदर्भ व मराठवाड्यातील नामांकित बैलजोड्या आणि अनुभवी चालकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. विविध गावांमधून आलेल्या शंकरपट प्रेमी नागरिकांनी मैदान भरून गेले होते. रंगीबेरंगी सजवलेल्या बैलजोड्या, स्पर्धकांचा जोश आणि प्रत्येक फेरीत होणारा टाळ्यांचा कडकडाट यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला.

shankar Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

स्पर्धा शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी आयोजकांनी पोलिस बंदोबस्तासह वैद्यकीय सुविधांचीही व्यवस्था केली होती. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. मंदिर विकासाच्या घोषणांसह पारंपरिक बैलगाडा शर्यतीच्या थरारामुळे हिमायतनगरमध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या आश्वासनांनी भारलेले वातावरण निर्माण झाले आहे.

विविध प्रकारच्या सजवलेल्या बैलजोड्यांनी मैदानात दमदार एन्ट्री घेत प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. शर्यतीत सहभागी झालेल्या बैलजोड्यांच्या वेगवान धावांनी आणि चित्तथरारक दृश्यांनी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवला. मैदानावर उडणारी धूळ, बैलांचा जोश आणि गाड्यांचा वेग पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. काही क्षण तर असे होते की, त्या थरारक दृश्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments