Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा
हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी ठोस पावले उचलली आहेत. मंदिराला सध्या प्राप्त असलेला ‘क’ दर्जा वाढवून ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पत्र देत सातत्याने पाठपुरावा सुरू केल्याची माहिती बुधवारी आयोजित शंकर पट स्पर्धेच्या उदघाटन मंचावरून बोलतांना दिली आहे.श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्यास भाविकांसाठी मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
हिमायतनगर भोकर, नांदेड हायवे लगत असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण जागेत सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्याचा मानस असून, चिमुकल्या बालकांपासून ते वयोवृद्ध मायमाऊलींना विरंगुळा मिळावा यासाठी...

