Scheduled Tribe students : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण

NNL Team
2 Min Read

नांदेड, दि. २० फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी दोन वर्षांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने निवडलेल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये हे मार्गदर्शन दिले जाणार आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल (EMRS) तसेच मान्यता प्राप्त खाजगी माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ११ वी व १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी (CET), जेईई (JEE) व नीट (NEET) या प्रवेश परीक्षांची तयारी करून देण्याचा उद्देश आहे. यामुळे शासकीय वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व आयटीआयमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे सुलभ होणार आहे.

प्रवेश क्षमता
प्रत्येक केंद्रावर इयत्ता ११ वी साठी:
CET/JEE – ५० विद्यार्थी
NEET – ५० विद्यार्थी

निवडलेली प्रशिक्षण केंद्रे
नाशिक विभाग – शासकीय आश्रमशाळा, बोपेगाव (नाशिक प्रकल्प) – मुलांसाठी
ठाणे विभाग – शासकीय आश्रमशाळा, शहापूर प्रकल्प – मुलींसाठी
अमरावती विभाग – शासकीय आश्रमशाळा, गोटेवाडी (कळमनुरी प्रकल्प) – मुलांसाठी
नागपूर विभाग – शासकीय आश्रमशाळा, सिंधीविहीर (वर्धा प्रकल्प) – मुलींसाठी

पात्रता निकष
विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
अनुसूचित जमातीतील असावा (जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक).
पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
विद्यार्थी संबंधित शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी उत्तीर्ण असावा (२०२५-२६ मध्ये इयत्ता १० वीमध्ये प्रवेशित).

नांदेड जिल्ह्यातील शासकीय/अनुदानित आश्रमशाळा, EMRS तसेच मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.

विहित नमुन्यातील अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, जि. नांदेड यांच्या कार्यालयात १८ फेब्रुवारी २०२६ पूर्वी सादर करावेत. प्राप्त अर्जांनुसार मार्च २०२६ मध्ये चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. असे आवाहन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी केले आहे.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!