HomeनांदेडMeghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| सिरंजनी गावाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांच्या यशस्वी कार्यकाळाच्या पूर्तीनिमित्त संत रोहिदास चौकात कृतज्ञता व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सरपंचांच्या कार्याची दखल घेतली.

कार्यकाळात राबविण्यात आलेले पाणीपुरवठा सुधारणा, स्वच्छता अभियान, अंतर्गत रस्त्यांची कामे, सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण व पारदर्शक कारभार यामुळे सरपंच मेघाताई करेवाड यांनी सर्वसामान्य ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय व थेट संवादाची कार्यपद्धती विशेष कौतुकास्पद ठरली असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.

IMG 20260211 WA0003 Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सरपंच सौ. मेघाताई करेवाड यांचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यासोबतच ग्रामपंचायत सदस्यांचाही त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांनी, “ग्रामस्थांनी दाखविलेला हा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हा गौरव व्यक्तीचा नसून संपूर्ण गावाच्या विश्वासाचा आहे. कार्यकाळ संपला असला तरी गावाच्या सेवेसाठीची जबाबदारी कधीही संपणार नाही,” असे मनोगत व्यक्त केले.

IMG 20260211 WA0007 Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आडेलू भाटे सर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समस्त ग्रामस्थ सिरंजनी यांच्या वतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमानंतर पवन करेवाड मित्र मंडळाच्या वतीने ग्रामस्थांसाठी ग्राम भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. हा कृतज्ञता सोहळा गावातील एकतेचे व विकासात्मक कार्याची दखल घेणारा ठरला असून, आनंदी व उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments