HomeनांदेडNanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

नांदेड| नांदेड–वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाली असून, शहराच्या राजकारणात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. शुक्रवार, दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत महापौर पदासाठी ५ तर उपमहापौर पदासाठीही ५ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली आहेत.

महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपा–शिवसेना आघाडी, काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या तिन्ही प्रमुख गटांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले असून, निवडणूक लढत बहुरंगी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापौर पदासाठी तिहेरी लढत – महापौर पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनांमध्ये भाजपा–शिवसेना आघाडी : २ अर्ज, काँग्रेस–वंचित आघाडी : १ अर्ज, एमआयएम : २ अर्ज, भाजपा–शिवसेना गटातून प्रभाग क्र. ०२ मधील कविता संतोष मुळे यांनी दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस–वंचित आघाडीच्या वतीने प्रभाग क्र. १८ मधील माहेजबीन अब्दुल फहीम, तर एमआयएमकडून प्रभाग क्र. १५ मधील अलकेसरी सुमय्या गुल्फाषण सरहान अलकेसरी यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एकाच उमेदवाराकडून एकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्याने छाननीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

IMG 20260206 WA0050 scaled Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

उपमहापौर पदासाठीही चुरस – उपमहापौर पदासाठीही एकूण ५ नामनिर्देशनपत्र दाखल झाली असून पक्षनिहाय चित्र असे आहे— भाजपा–शिवसेना आघाडी : २, काँग्रेस–वंचित आघाडी : १,  एमआयएम : २ भाजपा–शिवसेना आघाडीच्या वतीने प्रभाग क्र. १६ मधील दीपकसिंग काशिनाथसिंग रावत, काँग्रेस–वंचित आघाडीकडून प्रभाग क्र. ७ मधील राहुल मधुकर सोनसळे, तर एमआयएमकडून प्रभाग क्र. १३ मधील धोंगडे आश्विनी दशरथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

१० फेब्रुवारीला सत्तेचा फैसला
महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे अध्यक्षस्थान पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले भूषवणार असून, त्याच दिवशी महापौर–उपमहापौर निवडीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. शहराच्या विकासाचा कारभार कुणाच्या हाती जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून १० फेब्रुवारीचा दिवस नांदेडच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments