Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले
नांदेड| नांदेड–वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाली असून, शहराच्या राजकारणात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. शुक्रवार, दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत महापौर पदासाठी ५ तर उपमहापौर पदासाठीही ५ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली आहेत.
महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपा–शिवसेना आघाडी, काँग्रेस–वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या तिन्ही प्रमुख गटांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले असून, निवडणूक लढत बहुरंगी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापौर पदासाठी तिहेरी लढत - महापौर पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशनांमध्ये भाजपा–शिवसेना आघाडी : २ अर्ज, काँग्रेस–वंचित आघाडी : १ अर्ज, एमआयएम : २ अर्ज, भाजपा–शिवसेना गटातून प्रभाग क्र. ०२ मधील कविता संतोष मुळे यांनी दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस–वंचित आघाडीच्या...
