Homeक्राईमDIG Shahaji umap : डीआयजी शाहजी उमाप यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई; तब्बल...

DIG Shahaji umap : डीआयजी शाहजी उमाप यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई; तब्बल २ कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड | नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शाहजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या एका रात्रीत पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टोळीवर छापा टाकत सुमारे २ कोटी २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, जिल्ह्यातील रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० वाजता माळाकोळी ते खेडकरवाडी रस्त्यावर भारत बेंझ कंपनीचा एक हायवा अवैध रेती वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. सदर हायवामधून सुमारे पाच ब्रास रेती वाहतूक होत असल्याचे आढळून आले असून, हा हायवा २० लाख २५ हजार रुपयांच्या किमतीचा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नांदेड ग्रामीण हद्दीतील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याचे समोर आले. यावर पोलिसांच्या विशेष पथकाने रात्री २ वाजता मार्कंडेश्वर महादेव मंदिराजवळ धडक कारवाई करत Tata Signa कंपनीचे चार हायवा, एक JCB मशीन, रेती उपसण्याचे इंजिन, ताडपत्र्या, सुमारे ६० ब्रास रेती व इतर साहित्य जप्त केले. कारवाईची चाहूल लागताच संबंधित आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

IMG 20260205 WA0031 DIG Shahaji umap : डीआयजी शाहजी उमाप यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई; तब्बल २ कोटींचा मुद्देमाल जप्त

दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ५ हायवा – अंदाजे १ कोटी ६० लाख, १ JCB मशीन – २५ लाख, रेती उपसण्याचे इंजिन – १ लाख, ताडपत्र्या व रेती – लाखो रुपयांचा माल असा एकूण २ कोटी २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. या उल्लेखनीय कारवाईत सहभागी असलेल्या अधिकारी व अंमलदारांचे डीआयजी शाहजी उमाप यांनी विशेष कौतुक करत १० हजार रुपयांचे बक्षीस व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला आहे.

IMG 20260205 WA0033 DIG Shahaji umap : डीआयजी शाहजी उमाप यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई; तब्बल २ कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात आता ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जात असून, गुटखा, जुगारानंतर आता रेती माफियांवर झालेल्या या कारवाईमुळे स्पष्ट संदेश गेला आहे. कायदा मोडणाऱ्यांना आता कुणाचीही माफी नाही! नागरिकांनीही आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments