नांदेडक्राईम

भारतीय स्टेट बँकेच्या फ्रॉड एस. एम. एस. मुळे ग्राहक हैराण, सायबर गुन्हे शाखा याचा शोध घेणार का ? -NNL

हिमायतनगर शहरातील एका व्यापाऱ्यासह अनेकांचे मोबाईल हॅक...?

हिमायतनगर। गेल्या चार दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात अँड्रॉइड मोबाईल फोनवर भारतीय स्टेट बँकेकडून रिवॉर्ड पॉईंट मिळवा. असा एक एस. एम. एस. सर्वांच्या मोबाईलवर फिरतो आहे, त्या सोबत असलेल्या लिंकला क्लिक केल्यास संबंधित व्यक्तीचा फोन हॅक होण्याचे प्रकार हिमायतनगर शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचे परिणाम हिमायतनगर शहरातील सोशल मीडियावर चालणाऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सुद्धा दिसून येत आहेत. अनेक ग्रुपचे नाव अचानकपणे बदलून तिथे भारतीय स्टेट बँकेचा लोगो व नाव येत आहे. त्यामुळे फोन हॅक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या बाबीकडे भारतीय स्टेट बँक व सायबर सेल यांनी लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय तात्काळ दूर करावी, अशी मागणी हिमायतनगर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व नागरिकांनी केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून डिजिटल मैद्याचा जमाना आल्याने इंटरनेटचा युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आजच्या स्थितीला प्रत्येक घरात किमान २ एन्ड्रॉईड मोबाईल आहेत. सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रवेश मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे फोन हॅक करणे अत्यंत सोपे झाले आहे. अशा परिस्थितीत, तुमचा फोन हॅक झाला आहे हे समजले की माणूस हैराण होतो. असाच काहीसा प्रकार हिमायतनगर शहरात दोन दिवसापासून अनेकांच्या सोबाग घडला असून, त्यांच्या मोबाईलवर आलेल्या मेसेज आणि त्यावर दखविण्यात आलेली रिवॉर्ड मिळविण्याची लालसा यामुळे अनेकांचे मोबाईल हैक झाले आहेत.

दि.२४ जून रोजी हिमायतनगर शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा मोबाईल हॅक झाल्यामुळे त्यांच्या मोबाईल वरून भारतीय स्टेट बँकेच्या रिवार्ड पॉईंटवर पैसे येत असल्याचा एस.एम.एस. प्रत्येक नागरिकांच्या मोबाईल व व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरला. त्यामुळे असंख्यजन हा रिवार्ड पॉईंट मिळवण्यासाठी त्या लिंकवर क्लिक करत होते.

लिंकवर क्लिक करताचत्या व्यक्तीचा मोबाईल हॅक होऊन त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे ग्रुप लोगो बदलण्याचा प्रकार पहावयास मिळाला. या सर्व बाबींवर हिमायतनगर शहरातील भारतीय स्टेट बैंक लक्ष देऊन केंद्र सरकारच्या पुरस्कृत बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेचा लोगो एका अनाधिकृतपणे असंख्य ठिकाणी फिरत आहे त्यामुळे त्यांचे ग्राहक भयभीत होऊन अडचणीत सापडत आहेत. या सर्व बाबीकडे भारतीय स्टेट बँकेचे शाखा अधिकारी तथा त्यांचे विभागीय अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन सायबर सेलकडे तक्रार देवून प्रकार थांबवावेत, अशी मागणी होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!