HomeनांदेडMla. Baburao Kadam Kohlikar : “मी जे जनतेला आश्वासन देतो ते प्रत्यक्षात...

Mla. Baburao Kadam Kohlikar : “मी जे जनतेला आश्वासन देतो ते प्रत्यक्षात उतरवतो, केवळ ‘शो’ करत नाही” – आ. बाबुराव कदम कोहळीकर

हदगाव,शेख चांदपाशा | जनतेला दिलेल्या आश्वासनांमध्ये कोणतीही तडजोड न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देणारा नेता म्हणून ओळख असलेले हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी “मी जे सांगतो ते करून दाखवतो, केवळ घोषणा करून शो करत नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनाच्या औचित्याने हदगाव–हिमायतनगर तालुक्यातील पत्रकारांचा गौरव सन्मान सोहळा नांदेड रोडवरील वेंकटरमना हायटेक इंग्लिश स्कूल येथे पार पडला. यावेळी आमदार कोहळीकर बोलत होते.

आ. कोहळीकर यांनी सांगितले की, येत्या काही महिन्यांत सर्वधर्मीय भव्य विवाह सोहळा तसेच पुणे–नागपूरच्या धर्तीवर भव्य कृषी प्रदर्शन हदगाव विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे. या उपक्रमांमधून सर्वसामान्य शेतकरी, युवक व समाजातील प्रत्येक घटकाला लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पत्रकारांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची ग्वाही
पत्रकारांच्या अडचणी, समस्या व सुरक्षिततेबाबत बोलताना आमदार कोहळीकर म्हणाले की, पत्रकारांवर होणारे हल्ले, खोट्या गुन्ह्यांची नोंद व मुजोर अधिकाऱ्यांची दडपशाही गंभीर बाब असून, अशा अधिकाऱ्यां विरोधात शिवसेना संपर्क कार्यालयात तक्रार नोंदवही ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रकारांसाठी आवश्यक ते १०० टक्के सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

पत्रकार समाजाचा आरसा असून लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, पत्रकारांच्या सामाजिक कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. या सोहळ्यास युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पाटील हाडसणीकर, नगरसेवक गोपालभाऊ सारडा, माजी सभापती बाळासाहेब कदम, बाबुसाहेब कदम, डॉ. संजय पवार, सुदर्शन पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्याम लाहोटी यांच्यासह हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments