HomeनांदेडDr. Rajendra Wankhede : "माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगरचा कायापालट...

Dr. Rajendra Wankhede : “माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगरचा कायापालट करणार” — डॉ. राजेंद्र वानखेडे

हिमायतनगर (अनिल मादसवार) “जाती-धर्माच्या राजकारणाला मागे सारत केवळ विकासाला केंद्रस्थानी ठेवून नगरपंचायत निवडणूक लढवित आहोत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर शहराचा चेहरामोहरा बदलून टाकू,” असा ठाम विश्वास डॉ. राजेंद्र वानखेडे यांनी व्यक्त केला.

आज शनिवारी भाजपच्या वतीने नारळ फोडून अधिकृतपणे निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रथम ग्रामदैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ झाला. घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या मंचावर डॉ अंकुश देवसरकर, गिरीश जाधव, डॉ प्रसाद डोंगरगावकर, तालुकाध्यक्ष गजानन चायल, रामभाऊ सूर्यवंशी, विपुल दंडेवाड, कल्याण ठाकूर आदींसह भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

IMG20251122153427 01 1 Dr. Rajendra Wankhede : "माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगरचा कायापालट करणार" — डॉ. राजेंद्र वानखेडे

यावेळी बोलताना डॉ. वानखेडे म्हणाले कि, भाजपने हिमायतनगरच्या विकासाची ब्लु प्रिंट काढली आहे. त्यानुसार आमचा विकासाचे ध्येय ताहरविण्यात आले असून, विकास हेच लक्ष ठेऊन आम्ही“हिमायतनगर शहरात उद्यान, स्वच्छता, नालीमुक्ती आणि नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करणे हे आमचे पहिले ध्येय आहे.” “राजकारण हे सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर समाजसेवेचे साधन आहे.” ते पुढे म्हणाले की, फक्त आठ दिवसांत भाजपात प्रवेश करून दहा उमेदवार उभे केले. योग्य वेळी प्रवेश मिळाला असता तर सर्व प्रभागात उमेदवार उभारता आले असते.

युतीऐवजी स्वबळावर निवडणूक
युतीबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले कि, “मित्रपक्षासोबत चर्चा उशिरा झाल्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवत आहोत, मात्र आत्मविश्वास मोठा आहे.” पक्षातील भेद—मतभेदांवर उत्तर देताना भाजपातील दोन गटांच्या प्रश्नावर ते म्हणाले कि, “वैयक्तिक भावना बाजूला ठेवून निवडणूक जिंकणे हेच आमचे लक्ष्य आहे.

हि निवडणूक लढविताना आम्हाला कोणतेही आव्हान नाही — केवळ विकासावरच आमचे लक्ष” असून, जनतेला आवाहन करताना ते म्हणाले कि, “मतदान करताना विचार करा, व्यक्ती आणि शहराच्या भविष्यासाठी मतदान करा. जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही मजबूत करा.” निवडणुकीच्या तोंडावर डॉ. राजेंद्र वानखेडे यांची ही भूमिका आणि आत्मविश्वासामुळे शहरात राजकीय चर्चांना वेग आला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments