HomeनांदेडTraffic jam : हिमायतनगर शहरात मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जामची समस्या; नागरिक त्रस्त,...

Traffic jam : हिमायतनगर शहरात मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जामची समस्या; नागरिक त्रस्त, सिग्नल व ट्रॅफिक पोलिसांची मागणी

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| शहरातील मुख्य रस्त्यावर दररोज वाढणारी वाहतूक आणि वारंवार होणारे ट्रॅफिक जाम यामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच दर्शनासाठी येणारे भाविक प्रचंड त्रस्त झाले आहेत. विशेषतः सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत रस्त्यावरून जाणे ही मोठी कसरत ठरत असून अपघाताचा धोका सुद्धा वाढला आहे.

व्यवस्थित वाहतूक नियंत्रण नसल्याने वाहनचालकांचा संयम सुटत असून रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण होते. स्कूलबस, प्रवासी वाहने, एस टी महामंडळ बस, दोनचाकी-चारचाकी यांची कोंडी दररोज दिसून येत आहे. शहरातील वाढत्या वर्दळीला सक्षम असा वाहतूक नियोजनाचा अभाव जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

IMG 20251118 125237 Traffic jam : हिमायतनगर शहरात मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जामची समस्या; नागरिक त्रस्त, सिग्नल व ट्रॅफिक पोलिसांची मागणी
Oplus_16908288

या गंभीर समस्येतून दिलासा मिळावा यासाठी नागरिकांकडून मुख्य चौकांवर ट्रॅफिक सिग्नल बसविणे, वाहतूक पोलीसांची स्वतंत्र नियुक्ती करणे, तसेच अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

IMG 20251118 125224 Traffic jam : हिमायतनगर शहरात मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक जामची समस्या; नागरिक त्रस्त, सिग्नल व ट्रॅफिक पोलिसांची मागणी
Oplus_16908288

अनेक दिवसांपासून तक्रारी होत असतांना कोणतीही ठोस कारवाई न झाल्याबद्दल लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबवून ट्रॅफिक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी जनतेतून होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments