Homeक्राईमMartala ; मारतळा परिसरात अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या चालकासह वाहनांवर मुद्देमालासह...

Martala ; मारतळा परिसरात अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या चालकासह वाहनांवर मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

उस्माननगर l नांदेड जिल्ह्यातील मौजे मारतळा शिवारात मारतळा ते गोळेगाव जाणारे रोडवर विनापरवाना बेकायदेशीर रित्या शासनाचा महसूल चुकवून पाच ब्रास रेतीची अवैधरित्या चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन भारतबेंझ कंपनीचा हायवा क्रमांक एम एच ०३ सीपी ६७७७ मधून वाहतूक करत असताना आरोपी चालकासह २५ , २५००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून स्थानिक गुन्हे शाखेच्या नांदेड यांनी उस्माननगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी माहिती काढुन त्यावर केसेस करणे बाबत मा.श्री. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत श्री. उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड यांना आदेशीत केले होते.

त्यावरून दिनांक 11.11.2025 रोजी श्री. उदय खंडेराय पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.नांदेड यांचे आदेशावरुन वर नमुद अधिकारी व अंमलदार हद्दीत रवाना झाले असता नांदेड जिल्हयातील मौजे मारतळा शिवारात मारतळा ते गोळेगाव जाणारे रोडवर रेतीची अवैधरीत्या चोरटी विक्री करण्यासाठी नमुद आरोपी त्यांचे वाहनातुन वाहतुक करत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यावरुन वर नमुद अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावुन छापा कार्यवाही केली असता सदर ठिकाणी विनापरवाना बेकायदेशीर.

रित्या शासनाचा महसुल चुकवुन 05 ब्रास रेतीची अवैधपणे भारतबेंझ कंपनीचा हायवा क्रमांक एम एच ०३. सीपी ६७७७ यामधून वाहतुक करत असताना नमुद आरोपी 25,25,000/- रुपयाचे मुद्देमालासह मिळुन आला, सदर मुद्येमाल पंचासमक्ष जप्त करून क्रमांक 01 आरोपी यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन उस्माननगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर बाबत संबंधित आरोपीतांवर पोलीस स्टेशन उस्माननगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची उल्लेखनिय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments