Homeनांदेडलवकरच हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा कायापालट होऊन अत्याधुनिक सुविधा मिळणार - डी.आर.एम. नीती...

लवकरच हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा कायापालट होऊन अत्याधुनिक सुविधा मिळणार – डी.आर.एम. नीती सरकार -NNL

हिमायतनगर,अनिल मादसवार। मुदखेड आदीलाबाद या ब्रॉडगेज रेल्वे लाईनवर असलेल्या हिमायतनगर रेल्वे स्थानकाला आज दि 22 रोजी नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती नीती सरकार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या कामकाजाची पहाणी केली असून, संबंधित अधिकाऱ्याला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या नाविनिकरणाचे काम सुरू असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून कायापालट केला जात आहे, आगामी काळात हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अप्पर प्रबंधक राजेंद्र कुमार मीना यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, रेल्वे पोलीस मोठया संख्येने उपस्थित होते.

हिमायतनगर हे शहर तेलंगणा आणि विदर्भाच्या सीमेवर वसलेले असल्याने येथे दोन्ही प्रांतातील लोक खरेदीसाठी येतात, हिमायतनगर रेल्वे स्थानकावरून व्यापारी खरेदीसाठी मोठया शहराला व देवस्थान दर्शनासाठी जातात. मात्र हिमायतनगर रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट एक्स्प्रेसला थांबा नसल्याने नांदेडसारख्या रेल्वे स्थानकावर जाऊन मोठी एक्स्प्रेस पकडावी लागते. रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतागृहे, पोलीस चौकी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी आसन व्यवस्था, एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा, प्रतिक्षलय, शेड यांसह अनेक मागण्या केल्यानंतर हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकाच्या नविनिकरणासाठी रेल्वे मंत्र्यांनी 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामुळे येथील रेल्वे स्थानकाचे काम सुरू आहे, आता इलेक्ट्रॉनिक लाईटवर रेल्वे चालू झाली आहे.

IMG 20240622 132632 लवकरच हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा कायापालट होऊन अत्याधुनिक सुविधा मिळणार - डी.आर.एम. नीती सरकार -NNL

दरम्यान तीन महिन्यापूर्वी रेल्वे स्थानकाच्या निकृष्ट कामाबद्दल पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. दर्जा वाढविण्याच्या सूचना ठेकेदारांना केल्या होत्या तेव्हापासून येथील स्थानकावरील विकास काम थांबून आहे. सदरील काम लवकरात लवकर सुरू करून येथील स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हिमायतनगर रेल्वे स्थानकावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, धनबाद एक्स्प्रेस गाडीला थांबा, डेमो गाडीचे डब्बे वाढवा, स्थानकावर महिलांसाठी प्रतिक्षालाय सुरू करा, अपंग प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात यासह ईतर मागन्या पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराने डिजिटल मीडिया परिषदेचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मादसवार यांनी शनिवार दि 22 रोजी हिमायतनगर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या नांदेड रेल्वे डिव्हिजच्या विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांच्याकडे सर्व प्रवासी व गावकऱ्यांच्या वतीनं मांडल्या आहे.

IMG 20240622 140845 लवकरच हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा कायापालट होऊन अत्याधुनिक सुविधा मिळणार - डी.आर.एम. नीती सरकार -NNL

यावेळी नीती सरकार यांनी या सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगून रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक होण्यासाठी स्थानकाचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच तात्काळ महिलांसाठी सुरू करून रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था करा असे आदेश दिले. त्यानंतर नीती सरकार यांनी रेल्वे स्थानकाच्या सर्व विभागांतील कामकाजाची, टेक्निकल व ऑफिशियल माहिती घेऊन परिसराची पाहणी केली. तसेच इलेक्ट्रिक लाईनवर सुरू झालेल्या रेल्वेच्या प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे व्यवस्थापनाची तपासणी करून तिकीट बुकिंग आणि प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. एकूणचं त्यांच्या आजच्या दौऱ्यामुळे हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकाचे रखडलेल्या विकास कामाला लवकर सुरुवात होऊन गती मिळेल आणि रेल्वे स्थानकाचा कायापालट होईल अशी रास्त आपेक्षा हिमायतनगर रेल्वेस्थानकावरुन प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवासी व शहरवाशी नागरिकांना आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments