नांदेड l शिक्षण समाजाच्या प्रगतीसाठी आणि व्यक्तीच्या स्वाभिमानासाठी अत्यावश्यक आहे, म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे, कारण पिणार्याला ते सक्षम करते, हा संदेश लक्षात घेऊन उच्च शिक्षण घेऊन मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशासनातील मोक्याच्या जागा काबीज करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे,असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका शेख शकीला यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेमधून केले.


आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या पुढाकारातून आंबेडकरवादी मिशन डॉ. आंबेडकर चौक लातूर कॉर्नर सिडको नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शेख शकीला बानू बोलत होत्या. पुढे बोलताना मुस्लिम समाजाची प्रगती करावयाची असेल तर उच्च शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असेही शेख शकीला बानू यांनी नमूद केले.


व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, खा. रवींद्र चव्हाण, फारुख अहमद, अब्दुल सत्तार, सय्यद मोईन, डॉ. निहाल अहमद खान, अॅड. अल्ताफ अहेमद, एम.के. सय्यद, शेख सादिक, मराठा सेवा संघाचे कामाजी पवार, एकनाथ मोरे, डॉ. यशवंत चव्हाण, आनंद चव्हाण, पूर्व शिक्षण संचालक नंदन नांगरे, दिगंबर मोरे, प्रा. भास्कर दवणे, भगवान धबडगे, विठ्ठलराव गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुजाताताई पोहरे, अॅड. प्रसेनजीत वाघमारे, संपादक रमेश चित्ते,जयश चिंचगव्हाणकर,आणि अण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक,बा,रा,वाघमारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.




