Sheikh Shakeela ; शेख शकीला यांचे मुस्लीम विद्यार्थ्यांना मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेमधून आवाहन प्रशासनातील मोक्याच्या जागा काबीज करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्या
नांदेड l शिक्षण समाजाच्या प्रगतीसाठी आणि व्यक्तीच्या स्वाभिमानासाठी अत्यावश्यक आहे, म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे, कारण पिणार्याला ते सक्षम करते, हा संदेश लक्षात घेऊन उच्च शिक्षण घेऊन मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशासनातील मोक्याच्या जागा काबीज करून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे,असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका शेख शकीला यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेमधून केले.
आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या पुढाकारातून आंबेडकरवादी मिशन डॉ. आंबेडकर चौक लातूर कॉर्नर सिडको नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम शिक्षण क्रांती परिषदेच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शेख शकीला बानू बोलत होत्या. पुढे बोलताना मुस्लिम समाजाची प्रगती करावयाची असेल तर उच्च शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असेही शेख शकीला बानू यांनी नमूद केले....
