Homeनांदेडपंजाबमधून तख्त सचखंड श्री हजूर साहिब नांदेडला पोहोचणाऱ्या गाड्या उशिरा आल्याने भाविकांमध्ये...

पंजाबमधून तख्त सचखंड श्री हजूर साहिब नांदेडला पोहोचणाऱ्या गाड्या उशिरा आल्याने भाविकांमध्ये प्रचंड विरोध डॉ. विजयसतबीर सिंघ -NNL

नांदेड। गुरुद्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब नांदेडचे मुख्य व्यवस्थापक डॉ. विजय सतबीर सिंघ माजी आय.ए.एस. यांच्या आदेशानुसार आज एक विशेष शिष्टमंडळ रेल्वे विभागाचे डी.आर.एम. नीती सरकार मॅडम यांच्याशी भेट घेऊन सचखंड एक्स्प्रेस आणि पंजाबहून येणाऱ्या इतर गाड्या उशिरा आल्याने भाविकांना खूप अडचण होत आहे, ती त्वरित सोडवावी, अशी मागणी केली.

कोणतीही गाडी आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुटते, तर ती सुटण्याची नेमक्या वेळेची संबंधित प्रवाशांना द्यावी, जेणेकरून प्रवाशांना रेल्वे स्थानकावर उन्हाळी हंगामामुळे चार ते पाच तास थांबण्याचा त्रास होणार नाही. रेल्वे स्थानकाच्या प्रतिक्षेमुळे प्रवाशांना अनेक समस्या निर्माण होतात.

ज्या गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात आणि मार्गात थांबल्यामुळे आणखी उशीर होतो, त्यानंतर डब्यांमध्ये पाण्याची कमतरता असते आणि स्वच्छता अत्यंत खराब होते, ज्यामुळे यात्रेकरूंच्या अडचणी वाढतात गुरुद्वारा दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली, त्यावर डी. आर.एम. मॅडम नीती सरकार यांनी या समस्या अतिशय लक्षपूर्वक ऐकून घेतल्या आणि सांगितले की, भाविकांना येणाऱ्या अडचणींबद्दल आम्हाला खेद वाटतो आणि अनेक ठिकाणी तांत्रिक कामे सुरू आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पंजाबहून गुरुद्वारा दर्शनासाठी येणार्या भाविकांना होत असलेल्या त्रासावद्दल डॉ. विजय सतबीर सिंघ लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत अशी माहिती स. जसवंत सिंघ बॉवी दिल्ली यांनी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments