हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौड कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.


या दुर्गामाता दौडीचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य जनतेच्या मनात जागवणे तसेच देव–देश–धर्माची प्रेरणा युवकांमध्ये निर्माण करणे हा आहे.


ही दौड घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज सकाळी ५.३० वाजता कालिंका मंदिरापासून सुरू होऊन शहरातील मुख्य रस्त्याने निघून पुन्हा मंदिर परिसरात सांगता होत आहे. या वेळी सर्व शिवभक्त पांढरा कुर्ता-पायजमा, पांढरी टोपी व पदक घालून या दौड मध्ये सामील होतं असून शुभ्र वस्त्र बंधनकारक ठेवले आहे.



कार्यक्रमात मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग होतं असून, आयोजकांनी शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात उपस्थित होऊन दुर्गामाता दौडी दररोज सकाळी रामप्रसाद शहरात होत असून यामुळे परिसरात शिवसंस्कार आणि राष्ट्रभावनेचा उत्साह जागृत होणार असल्याचा विश्वास या दौडमध्ये सामील झालेल्या युवकांनी व्यक्त केला आहे.



