HomeनांदेडThe crisis of Himayatnagar farmers is deep : हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे संकट...

The crisis of Himayatnagar farmers is deep : हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे संकट गहिरे – ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत देण्याची मागणी

हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे हिमायतनगर तालुक्यातील शेती पिके मोठ्या प्रमाणावर पाण्यात राहून सडून गेली आहेत. उरलेसुरले पिकेही परतीच्या पावसामुळे अखंड पाण्यात राहून कोंब फुटू लागले (The crisis of Himayatnagar farmers is deep) आहेत. हे विदारक दृश्य पाहून शेतकरी राजा हाताश झाला असून, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या सुलतानी संकटामुळे हिरावून घेतला आहे.

IMG 20250928 WA0006 The crisis of Himayatnagar farmers is deep : हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे संकट गहिरे – ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत देण्याची मागणी

अत्यंत गंभीर संकट शेतकऱ्यांवर कोसळलेले असतानाही शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. “शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असून, आमची अवस्था मरणाच्या दारावर आणली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहे.

IMG 20250928 WA0009 The crisis of Himayatnagar farmers is deep : हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे संकट गहिरे – ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत देण्याची मागणी

यामुळे हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी, एकम्बा, सिरपली, डोलारी, पळसपूर, घारापूर, कामारी, मंगरूळ, बोरगडी, कोठा, हिमायतनगर, सिबदरा, आंदेगाव, पारडी यासह नाल्यालगतच्या लहानमोठ्या गावांतील शेतकऱ्यांकडून शासनाला ठोस उपाययोजनांची मागणी होत आहे.

IMG 20250928 WA0008 The crisis of Himayatnagar farmers is deep : हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे संकट गहिरे – ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत देण्याची मागणी

शेतकऱ्यांनी शासनासमोर प्रति हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत जाहीर करावी, ओला दुष्काळ घोषित करून कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी केली आहे. तसेच पंचनाम्याच्या निकषांमध्ये वेळ दवडू नये, तर शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे.

IMG 20250928 WA0007 The crisis of Himayatnagar farmers is deep : हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे संकट गहिरे – ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत देण्याची मागणी

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments