बिलोली l पत्रकार संरक्षण समितीची बिलोली तालुक्याच्या कार्यकारणी सहित कुंडलवाडी शहराची कार्यकारिणी बिलोली शहरातील आनंद गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात जाहीर करण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमात बिलोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, जिल्हा कार्यकारणी सदस्य अनिल मोटरगेकर आणि जिल्हा संघटक लक्ष्मीकांत कलमुर्गे व्यासपीठावर उपस्थित होते.


आयोजित कार्यक्रमात लक्ष्मीकांत कलमूर्गे (नांदेड जिल्हा संघटक ), शेख जावेद (नांदेड जिल्हा उपाध्यक्ष, सोशल मीडिया ), साई खंडेराय (बिलोली तालुकाध्यक्ष), गोनशेटवाड (बिलोली उपाध्यक्ष), कमलाकर जमदडे (बिलोली तालुका संघटक ), माधव पटणे (बिलोली तालुका सचिव ), मारोती भुसावळे (बिलोली तालुका सहसंघटक ), प्रसाद कुलकर्णी (बिलोली सहसचिव), नंदकुमार स्वामी (बिलोली तालुका सदस्य ), संजय हलबुर्गे (बिलोली तालुका सदस्य ), साईनाथ गुडमलवार (बिलोली तालुका सदस्य ) आदींची निवड करण्यात आले आहे. सदरील नवनियुक्त पत्रकार बांधवांना पोलीस निरीक्षक अतुल भोसले तसेच महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र तसेच ओळखपत्र देण्यात आले. यावेळी महेंद्र गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी नवनियुक्त पत्रकार बांधवांना मार्गदर्शन करताना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.




