HomeनांदेडShri Chhatrapati Ganesh Mandal ; श्री छत्रपती गणेश मंडळाकडून मंडगी शाळेला सीसीटीव्हीची...

Shri Chhatrapati Ganesh Mandal ; श्री छत्रपती गणेश मंडळाकडून मंडगी शाळेला सीसीटीव्हीची मदत

देगलुर l देगलूर तालुक्यातील मंडगी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन अनेक दिवसांपासून सुरू होते. अखेर गावातील श्री छत्रपती गणेश मंडळाच्या तरुणांनी पुढाकार घेत शाळेसाठी मदतीचा हात पुढे केला.

मुख्याध्यापक श्री. डाकोरे व शिक्षक श्री. साखरे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत मंडळाने त्यांच्या जमा निधीतून ५ हजार रुपयांचा निधी शाळेला दिला. या रकमेतून शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, शाळेला सुरक्षेची नवी सुविधा उपलब्ध झाली आहे.

गावातील तरुण मंडळींनी सामाजिक बांधिलकी जपत केलेला हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शाळेला नेहमीच मदत करणाऱ्या गावकऱ्यांसह श्री छत्रपती गणेश मंडळाचे शिक्षक व पालकांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments