Stormy winds destroy sparrow nests : वादळी वाऱ्याने चिमण्यांची घरे उध्वस्त; हिमायतनगर तालुक्यात पक्षीप्रेमींमध्ये चिंता

chiu Stormy winds destroy sparrow nests : वादळी वाऱ्याने चिमण्यांची घरे उध्वस्त; हिमायतनगर तालुक्यात पक्षीप्रेमींमध्ये चिंता

हिमायतनगर (अनिल मादसवार) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामुळे झाडांवर टांगलेली चिमणी पाखरांची घरटी उध्वस्त झाली. पिलांसाठी सुरक्षितता व खाद्य-पाण्याची सोय म्हणून चिमण्या पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात घरटी (खोपा) बांधतात.

मात्र, निसर्गाच्या या चक्रव्यूहात केवळ दहा दिवसांचेच आयुष्य या पिलांना लाभले काय..? असा हृदयस्पर्शी प्रश्न चिमणीप्रेमी व पक्षीसंवर्धन कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे.

IMG20250917100759 Stormy winds destroy sparrow nests : वादळी वाऱ्याने चिमण्यांची घरे उध्वस्त; हिमायतनगर तालुक्यात पक्षीप्रेमींमध्ये चिंता
oplus_32

वादळी वाऱ्यामुळे उध्वस्त झालेली घरटी पाहून पक्षीप्रेमींच्या डोळ्यात चिंता व दु:ख उमटले असून, भविष्यात अशा नाजूक जीवांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top