Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Pasha Patel – पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी बांबू-आधारित शाश्वत विकासाची गरज – पाशा पटेल
नांदेड लेख September 16, 2025

Pasha Patel – पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी बांबू-आधारित शाश्वत विकासाची गरज – पाशा पटेल

NNL TeamBy NNL TeamSeptember 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

“पृथ्वी आज अभूतपूर्व पर्यावरणीय संकटांचा सामना करत आहे. जगभरातील जंगलातील आगी व ढगफुटी यामुळे हे वातावरण बदलाचे नैसर्गिक संकट प्रत्यक्षात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबू हा “कल्पवृक्ष” म्हणून शाश्वत विकासाचा मार्ग सुचवला आहे. बांबूच्या अतिशीघ्र वाढीमुळे कार्बन शोषण, जंगलतोड रोखणे, आणि जैवइंधन निर्मिती शक्य आहे. 18-19 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत आंतरराष्ट्रीय बांबू परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद या संकटांना तोंड देण्यासाठी नव्या दिशा दाखवेल, या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह तज्ञ, शास्त्रज्ञ, आणि शेतकरी सहभागी होणार आहेत.”

पर्यावरणीय संकटाचा वाढता धोका
मनुष्य प्राण्याला पृथ्वीवर सुखा-समाधानाने जगण्यासाठी 33% भूभाग हा वनाच्छादित असला पाहिजे. जी पृथ्वी गेल्या दोन हजार वर्षात ०.५ डिग्री सेल्सिअसने तापली होती. तीच पृथ्वी औद्योगिकरणानंतर गेल्या दीडशे वर्षात 1.5 डिग्री सेल्सिअसने तापली. हे सगळं कशामुळे झाले तर जीवाश्म इंधनामध्ये पेट्रोल, डिझेल किंवा कोळशाचा वारेमाप वापर इंधन म्हणून केला गेला. परिणामी वातावरणातील कार्बन उत्सर्जन वाढले. याच गोष्टींचा अतिरेकी वापर पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहे. पृथ्वीतलावर 350 पीपीएम कार्बन उत्सर्जन असेल तर जीव- जंतू व्यवस्थित जगू शकतात. आज याच कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण हे 427 ते 430 पीपीएम पर्यंत पोहोचले आहे. संयुक्त राष्ट्राच्या आयपीसीसी (Intergovernmental Panel on Climate Change) नुसार 450 पीपीएम कार्बन उत्सर्जन झाल्यावर पृथ्वीवर विनाश घडणार आहे. आयपीसीसी च्या अहवालात 2030 मध्ये शंभर दिवसात पडणारा पाऊस हा 52 तासात पडेल असा इशारा देण्यात आला होता.

2030 ला अजूनही पाच वर्षाचा कालावधी आहे. आज पृथ्वीच्या पाठीवर कुठेही नॉर्मल स्वरूपाचा पाऊस पडत नाही. 47 डिग्री सेल्सिअस तापमान झाल्यानंतर माणूस प्राण्याचे मेंदू, हृदय, किडनी आणि इतर अवयव काम करू शकत नाही. आपण पाहिले की 2024 मध्ये दिल्लीचे तापमान हे 52.9 डिग्री सेल्सिअस झाले. त्याच वेळी दुबई चे तापमान हे 64 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोचले होते. सगळं काही आयपीसीसीच्या अहवालानुसार घडतंय फरक एवढाच की ते त्यांनी दिलेल्या अहवालानुसार आधीच तुमच्या आजूबाजूला घडतंय.

अलीकडेच अमेरिकेमध्ये 24 तासात 11 किलोमीटर लांबीच्या आणि अकरा लाख हेक्टर वरील जंगलाला वणवा लागला. जंगल जळून खाक झाले. सॅन फ्रान्सिसकोमध्ये सेलिब्रिटी राहत असलेल्या भागात दोन लाख घरांची जळून राख झाली. फ्रान्समध्ये हिरव्यागार द्राक्षबागा जळून गेल्या. इस्रायल देशामध्ये मध्ये इतकी मोठी आग लागली की ती विझवणे हे इस्रायल सारख्या प्रगत देशाला आटोक्याबाहेर गेले. कधी नव्हे ते यंदा युरोपचे तापमान हे 41 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते. आपल्या देशात उत्तरकाशीमध्ये संपूर्ण एक गाव 30 सेकंदामध्ये वाहून गेले.उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली गावाजवळील खीरगंगा परिसरात 6 ऑगस्ट 2025 रोजी ढगफुटीमुळे (cloudburst) अवघ्या काही सेकंदात प्रचंड पाणी आणि मलबा खीरगंगा नदीतून गावाकडे आला, ज्यामुळे धाराली गावाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला. या आपत्तीत 50 हून अधिक घरे नष्ट झाली, 4 जणांचा मृत्यू झाला, आणि 50 हून अधिक लोक बेपत्ता झाले. बाजारपेठा, वस्त्या, आणि गुरेढोरेही पाण्यात वाहून गेले.

आज पंजाबमध्ये चौदाशे गावं अतिवृष्टीमुळे पाण्याखाली आहेत. या अतिवृष्टीमुळे 37 जण मृत्युमुखी पडले असून तीन लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्र प्रभावित झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये यंदा मे आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विचित्र पद्धतीने प्रभावित झाल्याचे सगळ्यांनी पाहिले. असेच अतिवृष्टीचे यापूर्वी कधी न झालेले प्रकार पुणे आणि नागपूर शहरात झाले, आणि शहर बुडू लागल्याचे एकंदरीत चित्र दिसून आलं. मराठवाड्यातील नांदेडमध्ये पावणेतीन तासात नदीची पाणीपातळी 24 ft पेक्षा जास्त वाढली. नांदेडमधील पूरामुळे शेती, घरे, आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. पृथ्वी सहा खंडांमध्ये विभागली गेली आहे. आज परिस्थिती अशी आहे की एकाही खंडावर नैसर्गिक आलबेल अशी परिस्थिती नाही. ढगफुटी, महापूर, वनवे, उष्ण लहरी, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ अशा नानाविध नैसर्गिक संकटांनी पृथ्वीचे सगळे खंड प्रभावित झाले आहेत.

बांबू : शाश्वत विकासाचा कल्पवृक्ष
हरित आच्छादन वाढवावे लागणार आहे.आणि दुसऱ्या बाजूला जमिनीच्या पोटातले जीवाश्म इंधन वापरणे बंद करावे लागणार आहे. आणि हे केले नाही तर एक किलो दगडी कोळसा किंवा एक लिटर पेट्रोल जाळून निर्माण होणारे कार्बन उत्सर्जन संपण्यासाठी पुढील शंभर वर्षे देखील कमी पडतील. याला उत्तर एकच आहे की जमिनीच्या पोटा खालील डिझेल आणि पेट्रोल कोळसा वापरणे बंद करणे.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी जुलै 2023 मध्ये एका निवेदनात असे म्हटले होते की, “जागतिक तापमानवाढीचे युग (era of global warming) संपले आहे, आणि आता जागतिक होरपळीचे युग (era of global boiling) सुरू झाले आहे. आता तातडीच्या उपायांची गरज आहे” त्यांनी हे विधान 2023 मध्ये जगभरात झालेल्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटा, जंगलातील आगी, आणि इतर हवामान-संबंधित आपत्तींच्या पार्श्वभूमीवर केले होते. 2025 पर्यंत, ही परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे, आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज त्यांनी वारंवार अधोरेखित केली आहे.एक लढाई जीवाश्म इंधन ( Fossils Fuel) विरोधात जैवइंधन (Biofuel) अशी देखील आहे. त्यासाठी गंभीरपणे धोरणांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

बांबू हे अतिशीघ्र वेगाने वाढणारे गवत वर्गीय वनस्पती पीक आहे. काही प्रजाती (उदा., Dendrocalamus giganteus) दररोज 91 सें.मी. (36 इंच) पर्यंत वाढू शकतात. यामुळे बांबूला “टिम्बर ऑफ द ट्वेंटी-फर्स्ट सेंचुरी” असे संबोधले जाते. सामान्यतः बांबू 3-5 वर्षांत परिपक्व होतो, तर पारंपरिक झाडांना (उदा., साग, ओक) परिपक्व होण्यासाठी 20-50 वर्षे लागतात. बांबू हे डिझेल, पेट्रोल आणि कोळशाला पर्याय ठरणारे पीक आहे. त्याचबरोबर जंगलतोड रोखणे, ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, उष्मा कमी करणे अशा सगळ्याच वातावरण बदलाच्या संकटांना रोखणारा कल्पवृक्ष म्हणजे बांबू होय. एक ब्रीद वाक्य तयार केले आहे ते सांगतो की ‘Save Earth with Bamboo’.

बांबू लागवडीसाठी शासनाचे अनुदान
माणसाला दरवर्षी २८० किलो ऑक्सीजन लागतो. दिवसाला तीन फूट वाढणारा बांबू एका वर्षात 320 किलो ऑक्सीजन निर्मिती करतो. आणि 35 टक्के कार्बन शोषून घेतो. मग्रारोहयो योजनेतून महाराष्ट्र सरकार हेक्टरी 7 लाख चार हजार रुपयांचे अनुदान देत आहे. यामध्ये मजुरी आणि खड्डे खणणे तसेच रोपांचा पुरवठा करण्याच्या खर्चाचा देखील समावेश आहे.

आंतराष्ट्रीय बांबू परिषद : नव्या दिशेची सुरवात
1750 मध्ये इंग्लंडच्या ग्लासगो शहरात पहिले इंजिन फिरले. हवेतला ऑक्सिजन खाऊन कार्बन वाढवत नेला, तापमान वाढवले. गेल्या 250 वर्षात इंजिन वापरून वस्तू तयार केल्या. आता याच विकासातून पृथ्वीवरचा माणूस शिल्लक राहील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्हाला विकास हवा की प्रदूषणकारी यंत्रापासून निर्मित वस्तू? वस्तू वापरण्यासाठी माणूस देखील आवश्यक आहे. 1750 मध्ये विकासासाठी निर्माण झालेले मॉडेल आता उलटे फिरवावे लागणार आहे. हे असेच सुरू राहिले तर 2050 नंतर मानव जातीची अवस्था नरकात राहिलेले बरे पण पृथ्वीवर नको अशी होणार आहे. सावध ऐका पुढील हाका, अशी आताची परिस्थिती आहे. मानव जात वाचवण्यासाठी जीवाश्म इंधन (Fossile fuel) विरुद्ध जैवइंधन (Bio Fulel) अशी लढाई लढावी लागणार आहे. जैवइंधन निर्मितीसाठी बांबू हे चांगले शस्त्र आपल्या हाती मिळाले आहे. 14 सप्टेंबर 2025 रोजी आसाममधील नुमालीगड या ठिकाणी बांबूवर आधारित इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला अर्पण करणार आहेत. ही घटना देशाला आणि जगाला नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच येत्या 18 आणि 19 सप्टेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधत या सर्व गोष्टींची सांगोपांग चर्चा करण्यासाठी जगभरातील तज्ञ, अभ्यासक, शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकरी आणि धोरणकर्ते यांना मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात निमंत्रित करण्यात आले आहे.

मानव जातीच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण चर्चा आणि दोन दिवसाच्या परिषदेचे आयोजन हे फिनिक्स फाउंडेशन, लोदगा जि.लातूर आणि आणि राज्य सरकारची महाराष्ट्र सरकारच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (MITRA) संयुक्तपणे केले आहे. काळाची पाऊले ओळखून मानव जातीच्या रक्षणासाठी 18 आणि 19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये होणाऱ्या दोन दिवसाच्या चर्चासत्रांमध्ये बांबूपासून इथेनॉल, मिथेनॉल, थर्मल साठी बांबू पॅलेट्स, लोखंड चारकोल, लाकूड, फर्निचर, बांबू कपडे असे अनेक उद्योग, कौशल्य, पर्यावरण, प्लास्टिक मुक्तीतून शाश्वत म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दिशेने वाटचाल अपेक्षित असणार आहे. शहरी वनीकरण (Urban Forest), ऑक्सीजन पार्क, ग्रीन बिल्डिंग अशा अनेक नवकल्पना या परिषदेतून पुढे येणार आहेत.

आयपीसीसी म्हणजे (Intergovernmental Panel on Climate Change) च्या म्हणण्यानुसार आपण अजूनही ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न नाही केला तर येत्या काही काळात 40 टक्के धान्य, दूध, मासे उत्पादन कमी होणार आहे. हे आपणा सर्वांना परवडणार आहे का? आज देशाच्या अन्नधान्याचे कोठार असलेल्या पंजाब आणि हरियाणामध्ये हाहाकार माजला आहे. त्यांचा खरीप पाण्यात गेला आहे. परिणामी देशाची धान्य कोठार पाण्यात बुडाली. हे एकदा नाही तर आता यापुढील काळात वारंवार घडणार आहे. चला तर यातूनच मार्ग काढण्यासाठी एकत्र येऊन चिंतन आणि मनन करूया.

– पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग, महाराष्ट्र राज्य
कार्यकारी अध्यक्ष, मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्स

Pasha Patel the earth and the survival of mankind The need for bamboo-based sustainable development for the protection of
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAll beneficiaries : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या राज्यातील सर्व लाभार्थ्यांना सीएससी केंद्रामधून मिळणार माफक दरात सेवा
Next Article Maharashtra Gramin Bank : महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकऱ्यांच्या थकीत कर्जासाठी शेतकरी नवसंजीवनी व शेतकरी समाधान योजना जाहीर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Jain Old Age Home ; जैन वृद्धाश्रम येथे मोफत दंतचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन

July 20, 2025

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर

February 12, 2026

रवींद्र राठोड यांची अखिल भारतीय बंजारा सेना संघटनेच्या जिलाध्यक्षपदी नियुक्ती -NNL

July 9, 2024

beautiful Ganesh idol : धनेगाव येथील गणेश मुर्तीकार गोविंद चिलोरे यांच्या आकर्षक व सुबक गणेश मूर्तीला मागणी -NNL

August 31, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Bhagwatcharya Habhap. Mrs. Vaishnavi Didi Goud : हिंदू संस्कृती टिकविण्यासाठी लहापाणीपासून आपल्या मुलांना धार्मिक पुस्तिकेची ओळख करून घ्या – भागवताचार्य हभप. कु. वैष्णवी दीदी गौड -NNL

Kandhar news : कंधार मध्ये आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा पक्षप्रवेश : राष्ट्रवादी मजबूत

‘He Bandh Samaj Nishteche’ ; डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांच्या ‘हे बंध समाजनिष्ठेचे’ पुस्तकाचे २२ रोजी प्रकाशन – NNL

Bhoomipujan | साहेबराव गायकवाड यांच्या पाठपुराव्याने विकास कामांचे भूमिपूजन -NNL

Hadgaon-Himayatnagar assembly elections : हदगांव-हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाचा स्वतंत्र उमेदवार उभा रहाणार -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?