Bus service : औराळा-सुजलेगाव-नायगाव-नरसी बससेवा पुन्हा सुरू – ग्रामस्थांत आनंद

IMG 20250908 WA0057 Bus service : औराळा-सुजलेगाव-नायगाव-नरसी बससेवा पुन्हा सुरू – ग्रामस्थांत आनंद

औराळा (प्रतिनिधी) अनेक वर्षांपासून बंद असलेली औराळा–सुजलेगाव–नायगाव–नरसी बस सेवा खासदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू झाली आहे. या बस सेवेच्या आगमनाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

IMG 20250908 WA0058 Bus service : औराळा-सुजलेगाव-नायगाव-नरसी बससेवा पुन्हा सुरू – ग्रामस्थांत आनंद

बससेवेच्या शुभारंभप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक सुर्यकांत दमकोंडावार, हाणमंत सोमवाड, पोशट्टी कानगुले, माजी सरपंच नारायण पांचाळ, माधव पांचाळ, मनोहर पांचाळ यांच्या हस्ते नारळ फोडून पूजन करण्यात आले. यावेळी बस चालक श्री. कदम यांचा सत्कार माजी सरपंच सोपान गायकवाड यांनी केला.

IMG 20250908 214711 Bus service : औराळा-सुजलेगाव-नायगाव-नरसी बससेवा पुन्हा सुरू – ग्रामस्थांत आनंद
Oplus_16908288

गावात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बससेवा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी खासदार चव्हाण यांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी साईनाथ पा. पांढरे (उपसरपंच औराळकर) तसेच मौजे औराळा येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top