नवीन नांदेड l मराठा आरक्षण उपोषणासाठी सहभागी झालेल्या असरजन गावातील मराठा युवकांच्या असरजन ग्रामस्थ यांच्या वतीने ढोलताशांच्या गजरात भव्य दिव्य स्वागत व सत्कार सोहळा 3 सप्टेंबर रोजी भगतसिंग चौक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ग्रामस्थ व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आला.


मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान येथे सहभागी होण्यासाठी गावातील नंदु पाटील वैघ,बाळु वैध,धारोजी जाधव,बंडु जाधव,काळेश्वर जाधव, नारायण लुटे, छत्रपती जाधव, बजरंग वैध, भानुदास वैध,निकील वैध,रेशमाजी जाधव, संतोष वैध यांच्या सह गावातील अनेक समाज बांधव हे 29 ऑगस्ट रोजी वाहनाने सहभागी झाले होते, काल सायंकाळी हे आमरण उपोषण मागण्या मान्य झाल्या नंतर उपोषण संपले.



यानंतर गावातील समाज बांधव यांच्ये आज 3 सप्टेंबर रोजी आगमन भगतसिंग चौक येथे होताच ढोलताशांच्या गजरात व भव्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे काढुन ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये करून सहभागी झालेल्या समाजबांधव यांच्या भव्य दिव्य सत्कार विविध राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आला.


यावेळी माजी नगरसेवक राजू पाटील काळे,तातेराव जाधव, मारोती धुमाळ,शंकर पाटील जाधव,आनंदा धुमाळ, शिवाजी धुमाळ, भुजंगराव धुमाळ, मारोती वैध,प्रभु वैध ,दीपक जाधव ,काळेश्वर जाधव , कृष्णा जाधव,यांच्या सह समाजबांधव उपस्थित होते.



