आरोग्यनांदेड

Bhokar Ashram School ; भोकर आश्रमशाळा येथे आरोग्य तपासणी शिबीर

भोकर l आज दि. 08 ऑगस्ट 2025 रोजी
नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे, नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील व भोकर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथील आर.बी.एस.के. पथक क्र.1, दंत शल्यचिकित्सक विभाग, एन.सी.डी.विभाग, आर.के.एस.के. विभाग यांच्या संयुक्त विभागाने माध्यमिक आश्रम शाळा भोकर येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

या मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे वजन, उंची, औषध उपचार करण्यात आले, मौखिक आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुला-मुलींचे रक्त तपासणी करून रक्तक्षयाचे विद्यार्थी ग्रामीण रुग्णालय येचे संदर्भीत करण्यात आले, तसेच ” अंगदान जीवन संजीवनी अभियान ” कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थीनीना व शिक्षकाना अवयव दान विषयी माहिती देण्यात आली व आवयव दान फॉर्म भरून घेण्यात आले.

यावेळी दांत शल्यचिकित्सक डॉ. मायादेवी नरवाडे मॅडम, डॉ. वेंकटेश टाकळकर, डॉ. ज्योती येन्नावार, गिरी रावलोड, करंडेकर मॅडम, एन सी डी समुपदेशक रेणुका भिसे मॅडम, आर के एस के समुपदेशक सुरेश डुमलवाड, तसेच शाळेचे, मुख्यद्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button