Wednesday, May 13

Shivai Electric Bus ; शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांसाठी राखीव आसन परंतु वनफोर्थ तिकिटच नाही

नांदेड l राज्य शासनाच्या वतीने एसटी महामंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात वातानुकूलित बसेसची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिवशाही व शिवाई या इलेक्ट्रिक बस महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सोडत आहे. जिल्ह्यातील अनेक डेपो मधून शिवाई बसेस मोठ्या प्रमाणात प्रवाशांना घेऊन धावत आहेत परंतु नांदेड डेपो मध्ये शिवाई इलेक्ट्रिक बस आहेत परंतु त्यामध्ये दिव्यांगांना बसण्यासाठी आसन व्यवस्था राखीव आहेत मात्र वनफोर्थ तिकीटच उपलब्ध नसल्याने दिव्यांगांची मोठी हेळसांड होत आहे.

आज नांदेड बस स्थानकामध्ये काही दिव्यांग बांधव शिवाई इलेक्ट्रिक बसणे नांदेड ते हदगाव प्रवास करण्यासाठी बसमध्ये प्रवेश केला परंतु वाहकाने वन फोर्थ तिकीट नसल्याचे दिव्यांगांना सांगताच दिव्यांगांनी सकल दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क केला असता संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे.

चंपतराव डाकोरे यांना माहिती देऊन व स्थानकामध्ये बोलावले असता साळवे यांनी आपल्या शिष्टमंडळासह बसस्थानक गाठले. बराच वेळ बसस्थानकात वाहक व चालकासह अधिकारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी वनफोर्थ तिकीटासाठी ठाम भूमिका घेत असल्याने काही काळ बसस्थानकामध्ये तणाव निर्माण झाला होता. बऱ्याच बसेस थांबून ठेवण्यात आल्या होत्या.

त्यानंतर डेपो मॅनेजर यांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर संघटनेने यावर त्वरित उपाय करावा अशी विनंती केली परंतु दुसरीकडे राज्य शासनाच्या वतीने दिव्यांगांना विमानसेवा, रेल्वे सेवा यामध्ये मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत परंतु शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये मात्र आसन व्यवस्था राखीव आहेत.

परंतु वनफोर्थ तिकीटच नसल्यामुळे दिव्यांगांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होताना दिसत आहे त्या बसमध्येही आणि स्लिपर कोच बसमध्ये ही त्वरित वन फोर्थ सुविधा लागू करावी अशी मागणी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडे करणार असल्याचे सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे. चंपतराव डाकोरे आणि आदित्य पाटील यांनी सांगितले आहे.

यावेळी सकल दिव्यांग संघटनेचे आतिक हुसेन, कार्तिक कुमार भरतिपुरम,शेख वसिम,प्रेमकुमार वैद्य,शेख माजिद हणमंतराव राऊत, संतोष वटमवार.पन्हाळे यासह अनेक अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!