HomeनांदेडNandigram Express : नंदिग्राम एक्सप्रेस समोर आल्याने किनवट तालुक्यातील भिसी येथील 20...

Nandigram Express : नंदिग्राम एक्सप्रेस समोर आल्याने किनवट तालुक्यातील भिसी येथील 20 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

किनवट/हिमायतनगर| आदिलाबाद हुन मुंबईकडे जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेस समोर आल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 6 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. ही घटना हिमायतनगर ते जीरोना रेल्वे स्थानकच्या मध्ये घडली आहे. साईराज पांडुरंग लोलेपवाड वय 20 वर्ष रा.भिसी असे मयत युवकाचे नाव आहे. धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन जीवन यात्रा संपवले असल्याचे उपस्थित नागरीकातून सांगितले जात आहे.

आदिलाबादहुन, किनवट, सहस्रकुंड, हिमायतनगर, भोकर, नांदेड मार्गे मुंबईला जाणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेस या धावत्या रेल्वे समोर एका वीस वर्षीय तरुणांने उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिमायतनगर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर बुधवारी दुपारी तीन वाजता आदीलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस समोर किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कल जवळ असलेल्या भीसी येथील युवक आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत इंजिनच्या बाजूला असलेल्या पिनला युवक धडकल्याने तो फरफटत हिमायतनगर रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेसोबत आला यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

IMG 20250806 WA0014 Nandigram Express : नंदिग्राम एक्सप्रेस समोर आल्याने किनवट तालुक्यातील भिसी येथील 20 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

साईराज पांडुरंग लोलेपवाड हा आई-वडिलाला एकुलता एक होता पणधावत्या रेल्वे समोर उडी घेऊन जीवन यात्रा का..? संपवली याचे कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, युवकाचा मृतदेह हिमायतनगर रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या जीआरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतला. हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्नालयात त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे हिमायतनगर, इस्लापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments