Meghna Kavali ; मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन

NNL Team
By NNL Team

नांदेड l जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांच्या हस्ते आज जागतिक स्तनपान सप्ताहाचे (World Breastfeeding Week) उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन करताना स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरोग्य विभागाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दीप प्रज्वलन करून सप्ताहाचे रीतसर उद्घाटन केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुपोषित बाळ पुरस्कार देण्यात येणार आहे. आपल्या मार्गदर्शनात, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, “आईचे दूध हे बाळासाठी अमृतसमान आहे. पहिल्या सहा महिन्यांत बाळाला केवळ आणि केवळ स्तनपान देणे आवश्यक आहे. यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, बाळ निरोगी राहते आणि आई व बाळ यांच्यात भावनिक नाते अधिक दृढ होते.”

याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. संगीता देशमुख यांनी आरोग्य कर्मचारी,आशा सेविका आरोग्य विभाग आणि अंगणवाडी सेविकांना स्तनपानाबद्दल समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच, गरोदर मातांना आणि स्तनदा मातांना योग्य आहार, स्वच्छता आणि स्तनपानाचे फायदे याबद्दल माहिती देण्यावर भर देण्यास सांगितले.

हा सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत चालणार असून, या काळात विविध ठिकाणी स्तनपानाचे महत्त्व विशद करणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

तसेच आयटी बॉम्बे मी प्रशिक्षण दिलेल्या प्रशिक्षणार्थीने कार्यक्रमाला हजर असलेल्या सर्वांना स्तनपान या विषयाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
आयटी बॉम्बेने जे प्रशिक्षण दिले ते प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व स्तनदा माता व गरोदर मातांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवले यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले.

कार्यक्षेत्रातील डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात व्हाव्यात यासाठी समाजात जनजागृती करावी व शासकीय संस्थेमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढवावे असे सूचना दिल्या.

या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख , महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात , सह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी राठोड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे, वैशाली बेरलीकरphn, प्रा. आ केंद्रातील अधिकारी व कर्मचारी,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा सेविका आणि स्तनदा माता मोठ्या संख्येने माता उपस्थित होत्या.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!