Wednesday, May 13

Parmeshwar temple : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराच्या जतनासाठी पुरातत्व विभागाने लक्ष द्यायला हवं – गोविंद मुंडकर

हिमायतनगर, परमेश्वर काळे| (वाढोणा ) जिल्हा नांदेड हे गावं तेलंगणा सीमेलगत आहे. येथे असलेले भगवान श्री परमेश्वर मंदिर हे अद्वितीय ऐतिहासिक व धार्मिक स्थान असून, याकडे पुरातत्व विभागाने विशेष लक्ष द्यावे अशी स्पष्ट मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंद मुंडकर यांनी केली आहे.
 “जसे नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथील प्राचीन मंदिराचे जतन व विकासाचे कार्य सुरू आहे, त्याच धर्तीवर श्री परमेश्वर मंदिराचा देखील ऐतिहासिक वारसा जतन होणे अत्यंत आवश्यक आहे.” बुधवारी श्री परमेश्वर मंदिरास श्रावण मासानिमित्त गोविंद मुंडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन श्रीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसराची पाहणी केली. त्यांनी निरीक्षणात नमूद केले की, या मंदिराची पायाभरणी दगडी शिळांनी केलेली आहे, जे त्याच्या ऐतिहासिकतेचा पुरावा देतात.
IMG20250730180850 scaled Parmeshwar temple : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराच्या जतनासाठी पुरातत्व विभागाने लक्ष द्यायला हवं - गोविंद मुंडकर
oplus_0
यावेळी त्यांनी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्याशी संवाद साधून मंदिर परिसरातील स्वच्छता, व्यवस्थापन व विकासकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि अभिनंदनही केले. श्री परमेश्वर मंदिर हे श्रावण महिन्यात विशेष भाविकांचे श्रद्धास्थान बनते. त्यामुळे अशा पवित्र स्थळाचा पुरातत्वदृष्ट्या अभ्यास करून त्याचे जतन व विकास करणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी बालाजी गेंदेवाड, नागनाथ येळेगावे, मंदिर समितीचे सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक अनिल मादसवार, विलास वानखेडे, आदींसह अनेकांचे उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!