नांदेडमहाराष्ट्र

Raising Day : सीआरपीएफचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

नांदेड| मुदखेड येथे सेंट्रल ट्रेंनिग महाविद्यालयात, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ) दलाचा 87 वा स्थापना दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महानिरीक्षक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य ख्वाजा सजनुद्दीन यांनी सर्व अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटूंबियांना शुभेच्छा देवून सीआरपीएफ दलाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. सीआरपीएफची स्थापना 27 जुलै 1939 रोजी नीमच मध्यप्रदेश येथे क्राऊन रिप्रेझेंटेटिव्हज पोलीस म्हणून झाली. स्वातंत्र्यानंतर त्याची पुनर्रचना केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणून करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी 27 जुलै हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.

यावेळी महानिरीक्षकांनी शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहिली. क्वार्टर गार्डमध्ये त्यांना मानवंदना देण्यात आली आणि विशेष सैनिक संमेलनाला संबोधित करताना त्यांनी देशसेवेतील सैन्याच्या शिस्त, वचनबद्धता आणि योगदानाचे कौतुक केले.

स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुदखेड शहरात भव्य सायकल रॅली, सामुहिक वृक्षारोपन आणि केंद्रीय विद्यालयातील मुलांसह संस्थेच्य कॅम्पमधील मुलांसाठी विविध श्रेणीमध्ये चित्रकला स्पर्धा यांचा समावेश होता. यासोबतच प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थीमध्ये उत्साहाने क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष दिनानिमित्त सर्वाना एकता आणि उत्सवाचा अनुभव देण्यासाठी संस्थेच्या सर्व कॅन्टीनमध्ये बडा खाना या विशेष सामूहिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते.

कमांडंट कम चीफ ट्रेनिंग ऑफिसर वेद प्रकाश त्रिपाठी, डेप्युटी कमांडंट अरुण कुमार आणि मोहम्मद शाहनेवाज, असिस्टंट कमांडंट करणजीत सिंग आणि वासुदेव, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश कुमार आणि संस्थेचे अधीनस्थ अधिकारी, सैनिक, प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी या प्रतिष्ठित कार्यक्रमास उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button