श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते हिवळणी फाट्याच्या मध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या हिवळणी येथील राठोड यांच्या शेताच्या धु-यावर अज्ञात महिलेला तुराट्या व प-याट्या टाकून जाळल्याची घटना दिनांक ५ जून रोजी रात्री ९.३० वाजता उघडकिस आली होती , या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
सदरील महीला हि अंदाजे २०ते २५ वर्षाची असल्याचा अंदाजा आहे. ती १२ ते १४ आठवड्याची गरोदर व तिचा गळा चिरून व स्कार्प ने आवळून खून केल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अकस्मात मुत्युची नोद करण्यात आली होती.
शवविच्छेदन अहवाल आल्याने अखेर दि,११ रोजी रात्री सपोनी एस एम परगेवार यांच्या फिर्यादी वरुण माहुर पोलीसांनी भारतीय दंड संहिता कलम 302, 315, 201 नुसार गुन्हा क्रमांक 65/2024 दखल केला आहे. त्या घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री कुष्ण कोकाटे,अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरने,स्थागुशाचे पोनी उदय खंडेराय,अदिनी भेट दिली होती, पंरतु ७ दिवस उलटूनही या गुन्हाचा शोध लागत नाही हा चर्चेचा विषय आहे.
घटनास्थळी तिची ओळख पटण्यासारखा कुठलाही पुरावा त्या घटनास्थळी आढळून आला नाही. घटनेच्या तपासाचे कडवे आव्हान पोलीसांसमोर आहे , या महीलेला जाळून पुरावा नष्ट करण्यामागचा उद्देश्य काय ? सदरील हत्या अनैतिक संबंधातुन तर झाली नसावी ? असे ऐक ना अनेक प्रश्न आहेत पंरतु पोलीसांना शोध लागत नसल्याने नागरीकात चर्चेचा विषय आहे.