Thursday, May 21

St employees : 27 जुलै रोजी नाशिक येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला नांदेड विभागातून शेकडो कर्मचारी जाणार

नांदेड| सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दि 27जुलै रोजी नाशिक येथे एसटी कर्मचाऱ्यांचा मेलावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी नांदेड विभागातून शेकडो कर्मचारी सहभागी होणार आहेत.

ह्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार आहेत .त्यांच्या उपस्थिती हा कार्यक्रम होत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनं न्याय मिळेल हे नक्की आहे . आ.गोपीचंद पडळकार व आ.सदाभाऊ खोत व सतीश मेटकरी यांच्या नेतृत्वात सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा एसटी कर्मचाऱ्यामध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.आ .पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न निकाली लावले आहेत.

भूतो नं भविष्य अशी सरसकट मूळ वेतनात 6500 ची वाढ ही केवळ आ.पडळकर यांच्या मध्यस्थीने मिळाली ,हे सर्व कर्मचाऱ्यांना न्यात आहे त्यामुळे आ .गोपीचंद पडळकर यांच्यावर विश्वास ठेवून नांदेड विभागातून शेकडो कर्मचारी नाशिक येथील मेळाव्याला हजर राहणार आहेत. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघांचे नांदेड विभागीय अध्यक्ष प्रवीण साले, विभागीय सल्लागार संतोष पांडागळे व विभागीय सचिव संदीप जेटी यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!