Due to heavy rain : सिडको परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरावरील पत्रे उडून पडली,कुठलीही जीवितहानी नाही

नवीन नांदेड़| सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिडको येथील,शंकरनगर परिसरातील सम्यक नगर येथे राहणाऱ्या लक्ष्मी अमोल मेडपलिवार यांच्या निवासस्थाना वरील पत्रे उडून पडल्याने घराची पडझड संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरातील ‌कोणालाही मार लागला नसुन अचानक झालेल्या नुकसाना‌ बदल नांदेड़ तहसीलदार संजय वारकड यांनी माहिती दिल्यानंतर यांनी त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिले असून वाघाळा तलाठी सज्जा वानोळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.

बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे पावसाने सम्यक नगर‌ येथील मेडपलिवार यांच्या निवासस्थानी असलेले पत्रे उडून खाली ‌ऊडुन संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सदरील घटनेबाबत सहायक आयुक्त मिर्झा बेग, पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी चर्चा केली घटना स्थळी तलाठी एस.ए.वानोळे सहायक व्यंकट इंगले,विजय जोंधळे यांनी पंचनामा केला,असून लक्ष्मी अमोल मेडपलिवार यांच्या घरातील छताचा पंखा, कूलर, टेबल टीव्ही व घरातील संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसान झाले.

सदरील घटना घडली यावेळी घरातील सात सदस्य होते यात एक गरोदर माता पण होती, आजुबाजुच्या नागरीक यांनी सहकार्य करून सारवा‌ सारव करून संबंधित परिवाराला दिलासा देऊन सदरील घटना वाघाळा तलाठी सज्जा यांना‌ कळवली, घटनास्थळी तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल तहसीलदार संजय वारकड यांना पाठविला आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते गणेश जयस्वाल, गजाननसिंह चंदेल यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button