Masred : अवैध व्यवसाय विरोधी अभियान – 3 नांदेड परिक्षेत्रात ‘मासरेड’

Photo 1 1 Masred : अवैध व्यवसाय विरोधी अभियान - 3 नांदेड परिक्षेत्रात 'मासरेड'

नांदेड| परिक्षेत्रात हातभट्टीची दारू व रसायनाचा नाश, त्याचप्रमाणे अवैध दारूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी, दिनांक 19.7.2025 रोजी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत एकाच वेळी मासरेडचे आयोजन करण्यात आले होते.

परिक्षेत्रातील, नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यांत मासरेड दरम्यान, संबंधित घटकांनी केलेली कार्यवाही खालील प्रमाणे :

.क्र. जिल्हा एकुण दारुबंदी केसेस सहभागी आरोपींची संख्या जप्त मुद्देमालाचे वर्णन जप्त मुद्देमालाची किंमत सहभागी अधिकारी व अंमलदारांची संख्या
 

1

नांदेड 61 61 1.हातभटटी दारु 2565 लिटर 3,14,520/-  अधिकारी  :71

अंमलदार  :225

2. दारुचे रसायन 1280 लिटर
3.देशी दारु        699 बॉटल
4.सिंदी             480 लिटर
2 परभणी 35 36 1.हातभटटी दारु 21 लिटर 44,510/-  अधिकारी  : 25

 अंमलदार   : 158

2.दारुचे रसायन  120 लिटर
3.देशी दारु 462 बॉटल
3 हिंगोली 42 42 1.हातभटटी दारु 10 लिटर 54,160/-  अधिकारी  : 21

 अंमलदार  :130

2.देशी दारु 698 बॉटल
4 लातूर 29 28 1.हातभटटी दारु 314  लिटर 1,55,305/-  अधिकारी : 30

 अंमलदार :150

2. दारुचे रसायन 600 लिटर
3.देशी दारु 214 बॉटल
4.विदेशी दारु     25 बॉटल
एकुण 167 167 1.हातभटटी दारु 2910 लिटर 5,68,495/- अधिकारी :147

अंमलदार : 663

2. दारुचे रसायन 2000 लिटर
3.देशी दारु        2073 बॉटल
4.विदेशी दारु     25 बॉटल
5.सिंदी             480 लिटर

photo 2 2 Masred : अवैध व्यवसाय विरोधी अभियान - 3 नांदेड परिक्षेत्रात 'मासरेड'सदर कारवाईत, नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, परभणीचे पोलीस अधीक्षक  श्री. रवींद्रसिंह परदेशी, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे व लातूरचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली, संबंधित जिल्ह्यातील अपर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उप अधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार यांचे सह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचा समावेश होता.

सदर कारवाईत परिक्षेत्रातील (147 ) अधिकारी व (663 ) अंमलदार सहभागी झाले होते. चारही जिल्हयांनी  केलेल्या मासरेड दरम्यान एकुण ( 167 ) केसेस नोंदविण्यात आल्या असुन   5,68,495/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी, संबंधित पोलिसांना देऊन, पोलिसांच्या सदर मोहिमेस हातभार लावावा, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top