Nanded ; महावितरण कंपनी नांदेड कडून वारंवार होत असलेली विद्युत मिटर बदली त्वरीत थांबविण्यात यावी, भि.ना.गायकवाड यांच्यी मागणी
नवीन नांदेड l महावितरण कंपनी कडून गेल्या दहा वर्षात तीन वेळा ग्राहकाचे विद्युत मिटर बदलण्यात आले आहे. प्रत्येक मिटरची किंमत विद्युत बिलामध्ये आकारण्यात आली असून कुणाचे तरी हीत जोपासण्या साठी किंवा कुणाला तरी आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी वारंवार विद्युत मिटर बदलण्याचे कंत्राट जवळच्या हितसंबंधी लोकांना देण्यात येत आहे यामुळे संबंधीत विज ग्राहक मध्ये तिव संतोष पसरला असून हि मोहीम त्वरित थांबवावी अशी मागणी भाजपचे सक्रिय सदस्य भि.ना.गायकवाड यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.


दिलेल्या निवेदनात सिडको परिसरात बसविण्यात आलेल्या सध्या कार्यरत असलेले विद्युत मिटर फॉल्टी नाही,ग्राहकांनी त्यामध्ये छेडछाड केलेली नाही. किंवा विद्युत मिटर बंद अवस्थेत नाही. मिटर बदलून मिळणे साठी ग्राहकांने महावितरण कडे विनंती केलेली नाही असे असतांना मिटर का बदलण्यात येत आहे याचे कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात येत नाही. त्यामुळे ग्राहकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नांदेड दक्षिण भागात वरील पैकी कुठलेही कारण नसतांना विद्युत मिटर बदलण्यात येत आहेत.

सकृत दर्शनी विद्युत मिटर फॉल्टी असल्याचे सिध्द होत असेल, विद्युत मिटर बंद आवस्थेत असेल, विद्युत मिटर मध्ये ग्राहकाने छेडछाड केली असेल, किंवा विद्युत बदलून मिळण्याची ग्राहकाची विनंती असल्याशिवाय विद्युत मिटर बदलण्यात येऊ नयेत, अशा सुचना महावितरण कंपनीला देण्यात याव्यात, अन्यथा ग्राहक व महातिवरण कंपनीचे कर्मचारी यांच्या मध्ये वाद होऊन कायद्याचा भंग झाला तर त्यास सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार राहील ,असे निवेदनाद्वारे इशारा भि.ना.गायकवाड यांनी दिला आहे.





