Homeनांदेडdeglur shivsena : शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा वाटप करा: अन्यथा शिवसेना आंदोलन करणार

deglur shivsena : शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा वाटप करा: अन्यथा शिवसेना आंदोलन करणार

देगलूर, गंगाधर मठवाले | प्रसंगी शेतकर्यांना हक्काचा पिक विमा हेच एक मदतीचा मार्ग राहीला आहे. ज्या शेतकर्यांना २५ टक्के मिळाली नाहीं त्या शेतकर्यांना तत्काळ पिक विमा वाटप करण्यात यावा. अन्यथा देगलूर बिलोली मुखेड शिवसेना उध्वव ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर महेश पाटील बालाजी पाटील उमेश पाटील शिवकुमार बामणे विपुल पटने यांच्या सहया आहे.

देगलूर बिलोली मुखेड तालुक्यातील शेतकर्यांना 2०२३ -२४खरीप हंगामातील पीकविमा वाटप करा. अन्यथा शिवसेना उध्वव ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेड येथील न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालया समोर उग्र व तीव्र. आंदोलन करण्याचा इशारा अपर निवासी जिल्हाधिकारी अबेकर व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकारयाना शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले.

IMG 20250719 154520 deglur shivsena : शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा वाटप करा: अन्यथा शिवसेना आंदोलन करणार

खरीप हंगाम २०२४ला शेतकरी बाधवानी सावकारी बिन सावकारी बँकेचे व्याजीबटी. कर्ज काढून महागामोलाचे बियाणे खते खरेदी करून सोयाबीन कापूस उडीद मुग आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. पण वारंवार झालेल्या अतिवृष्टी मुळे खरीप हंगामातील पीक वाया गेल्याने शेतकरी राजा कधी नव्हे एवढा आर्थिक संकटात सापडला होता. यांची दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांना तत्कालीन जिल्ह्याधिकारी याच्या आदेशानुसार खरीप हंगामातील शेतकर्यांना २५ टक्के अग्रीम बोनस नुकसान भरपाई पिक विमा कंपनीने वाटप केले होते.

त्यात सुध्दा अनागोंदी अनियमितता असल्याने असंख्य शेतकरी बाधवाना २५ टक्के रक्कमेपासुन सुध्दा वंचित राहावा लागले होते. या खरीप हंगामातील शेतीसाठी लागणारे महामोलाचे खते बियाणे किटकनाशक खरेदी करून पेरणी केली आहे. पावसाने पुन्हा पाठ फिरवून उघड पडल्याने या वर्षीचा खरीप हंगाम वाया जातो की काय..? अशी कोरड दुष्काळी परिस्थिती दिसते आहे.

तरी पण निसर्गाच्या भरवशावर पुढील मशागत करण्यासाठी आर्थिक अडचणी असल्याने मदत मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बाधवाना अनुदानाच्या मदतीची अत्यंत गरज आहे. पाच वर्षापासून ओला दुष्काळ पडला असल्याने शेतकरी बाधवाना कोणी उसनवारी सुध्दा देत नाही. थकबाकीदार शेतकर्यांना बॅकासुधा फटकू देत नाहीत अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं असा प्रश्न पुढे येऊ लागला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments