Ujjwala Padlawar :जनसुरक्षा विधेयकाविरोधात लढा तीव्र करा : कॉ. उज्वला पडलवार

लोहा| जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली भाजपा सरकार सर्वसामान्यांच्या अधिकारांवर गदा आणत आहे. कष्टकरी कामगारांची आंदोलने आणि संघटना मोडून काहुकूमशाही लादण्याचे यामागे भाजपाचे कट-कारस्थान आहे. त्यामुळे हे विधेयक उलथवून लावण्यासाठी तीव्र लउभारावा. यात प्रत्येक कष्टकरी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सीटूच्या प्रदेश सचिव कॉ. उज्वला पडलवार यांनी केले आहे. लोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या आशावर्कर व गट प्रवर्तकांचे चौथे तालुका अधिवेशन पार पडले; यावेळी त्या बोलत होत्या.


आरोग्य विभागाचा कणा तसेच अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या आशावर्कर आणि गटप्रवर्तकांना मानधन देण्याऐवजी त्यांना किमान वेतन देण्यात यावे व शासकीय सेवेत समायोजन करावे, या मागणीसाठी सीटूच्या झेंड्याखाली सातत्याने संघर्ष सुरू आहे. त्यास यश मिळत असून अलिकडे राज्य शासनाकडून दहा हजार रूपये वामिळवून घेण्यात सीटू संघटनेस यश मिळाले आहे.

त्या अनुषंगाने तालुक्यातील सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे तालुकास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात येत आहेत. त्या धर्तीवर लोहा तालुक्यात चौथे अधिवेशन घेण्यात आले.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनच्या अध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार या होत्या, तर प्रमुख उपस्थितीमध्ये ग्लोबल इंग्लिश स्कूलचे सचिव तथा इमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दीपक मोटे प्रा. मनोजकुमार यांची उपस्थिती होती. या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी एसएफआयचे जिल्हा उपाध्यक्ष साथी प्रफुल कऊडकर नेहा कऊडकर हे होते.


शिक्षणाची जननी माता सावित्री फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मेळाव्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा पाटील यांनी करून मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. अधिवेशनाला SFI चे जिल्हा उपाध्यक्ष साथी प्रफुल कऊडकर नेहा कऊडकर हे ही उपस्थित होते .प्रारंभी शिक्षणाची सावित्री फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले .

यावेळी अध्यक्षीय समारोपात बोलताना कॉ.उज्वला पडलवार म्हणाल्या की , सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या लढ्याला यश आले असून सातत्यपूर्ण आंदोलनामुळे आशाना दहा हजार रुपये मानधनात वाढ झाली आहे. यासाठी १२ फेब्रुवारी ते १ मार्च असे २३ दिवस मुंबई येथे मुंबईच्या आझाद मैदानावर अखंड आंदोलन करण्यात आले. लढल्याने जिंकता येते हा इतिहास असल्यामुळे सीटू कामगार संघटनेचा इतिहासावर विश्वास आहे.
जोपर्यंत किमान वेतन आणि शासकीय सेवेत समायोजन होणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असे ही त्या म्हणाल्या. मंचावर तालुक्यातील गटप्रवर्तक सविता आढाव , देऊबाई मोरे, सविता फाजगे , संगीता श्रीरामे, अरुणा पांचाळ , मीरा गवते , शकुंतला चिंचोळे , आम्रपालीताई कांबळे आदी उपस्थित होत्या. यावेळी मेळाव्याचे प्रस्ताविक लक्ष्मीबाई भूदडे यांनी केले तर आभार शोभा जाधव ताईंनी मानले.



