नांदेड| शहरातील वाढता विस्तार होत असलेल्या तरोडा खुर्द क्षेत्रातील तिरंगानगर–रघुनाथनगर या जुळ्या वसाहतीत आ.बालाजीराव कल्याणकर यांच्या मोठ्या प्रयत्नाने भुमिगत ड्रेनेज , सिमेंट रस्ते, नळपाणी पुरवठा योजना झटपट पुर्ण करण्यात आल्या.


तथापि स्वच्छता राखण्यासाठी घंटागाडी गाडीची कमतरता होती ती ९ जुलै २५ रोजी येथिल विकास समन्वय समितीने तरोडा सांगवी क्षेत्रिय कार्यालय महानगरपालिका सहाय्यक आयुक्त साहेबांना निवेदन सादर केले.त्यावर त्वरित कार्यवाही होऊन आज घंटागाडी या वसाहतीत आल्याने येथील प्रतिष्ठित नागरिक संजयसिंग चव्हाण, कैलास सावते यांच्या हस्ते घंटागाडीची पुजा करुन घंटागाडीला पुष्पहार अर्पण करून चालक साईनाथ मिसे स्वच्छता कर्मचारी किशन हिंगोले यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.


छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात निवृत्त जिल्हा प्रसिध्दी अधिकारी रामचंद्र देठे यांनी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती निलावती डावरे स्वच्छता निरीक्षक आनंद गायकवाड यांचे आभार मानले. यावेळी आनंद कानगुले, बालाजी देवकांबळे, परमानंद नाईक आदी उपस्थित होते. महानगर पालिका क्षेत्रिय कार्यालय तरोडा सांगवी येथील अधिकारी कर्मचारी नेहमी सहकार्य करतात हे दिसून आले.




