नांदेड| नांदेड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील रीजनल वर्कशॉप ते नागार्जुन हॉटेल या प्रमुख रस्त्यावर असलेल्या शारदानगर भागातील पादचारी मार्गावर (फुटपाथ) एक जुने आणि पूर्णपणे जीर्ण अवस्थेतील झाड धोकादायक अवस्थेत होते. पादचाऱ्यांना अडचण निर्माण करणारा हा लाकडाचा सांगाडा (Commissioner’s visit to senior citizens on Guru Purnima) अखेर नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त श्री जाधव यांच्या पुढाकाराने हटविण्यात आले.


शारदानगर फलकाजवळ असलेले हे झाड केवळ लाकडाचा सांगाडा उरलेले होते, पादचार्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करत होते. या झाडाच्या व्यवधानामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली , चांगल्या प्रवृत्तीच्या स्थानिकांनी याच्या त्वरित हटवणीची मागणी लावून धरली. ही मागणी जेष्ठ पत्रकार तथा सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर यांनी आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या निदर्शनास आणून दिली.


कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे आणि सहाय्यक आयुक्त जाधव यांनी उद्यान अधीक्षक बेग यांच्या सहाय्याने व्यवधान ठरलेला लाकडाचा सांगाडा काढून टाकला. गुरु पौर्णिमेच्या दिवशी डॉ. महेश कुमार यांच्या आदेशाने पादचारी रस्त्याचा वापर करणारे प्रफुल्लित झाले. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आयुक्तांना गुरु पौर्णिमेच्या आशिषपूर्ण सदिच्छा दिल्या आहेत.



आयुक्तांनी लाकडाचा सांगाडा तर काढला नागार्जुन हॉटेल ते वर्कशॉप या पादचारी रस्त्यावरील अनाठाई सामान काढून पादचारी मार्ग मोकळा करावा. अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या सांगाड्या प्रमाणे पादचारी रस्ते कधी मोकळा श्वास घेतील याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
