HomeकरियरMission Nirbhaya : मिशन निर्भया अंतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन

Mission Nirbhaya : मिशन निर्भया अंतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन

नांदेड| शालेय विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती, सोशल मीडीयाचा वापर, वाहतूक सुरक्षा, सेल्फ डिफेन्स, कायदे विषयक जनजागृती (शस्त्र अधिनियम, ईव्ह टीजिंग रॅगिंग), गुड टच, बैंड टच, बाबत माहीती, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, नैतिकता ई, तसेच “मिशन समाधान” या मध्ये महिलांच्या व विद्यार्थिनींच्या सुरक्षितसेसाठी QR कोड आधारित तक्रार नोंदणी सुविधा, याविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र असे नाविण्यपुर्ण उपक्रम राबवण्याचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. अंतिम टप्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे तज्ञ, Subjuct/Faculty Expert यांचे पॅनल डिस्कशन असणार आहे.

मिशन सहयोग : अंतर्गत खालील 08 नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत आहोत. त्यापैकी “मिशन निर्भया मार्गदर्शन सत्र यामध्ये शहरातील सर्व कोचोग इन्स्टीटयुट आणि क्लासेस मधील जवळपास 50,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच विशेषतः ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या 10,000 मुली व विद्याथी तसेच शाळा व महाविद्यालयीन 20,000 विद्यार्थी व 1500 शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे,

विशेष प्रशिक्षण सत्रे :- जवळपास 5000 मुलो व लहान मुले यांना सेल्फ डिफेन्स संरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष लैंगीक अत्याचाराचे गुन्हयाचा तपास वेळीच पूर्ण करण्यासाठी 2000 पोलीस व सरकारी वकील यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. पालक व कुटुंबासाठी देखील सत्र आयोजीत करण्यात येणार असुन यामध्ये जवळपास 500 कुटूंब सदस्यांचा सहभाग नोंदविण्याचे प्रस्तावित आहे. सदर प्रथम टप्यात थेट लाभार्थी 90,000 ते 1,00,000 च्या जवळपास असतील, दुसरा टप्पा हा ग्रामीण भागात आयोजीत करण्याचे ठरविले आहे.

IMG 20250710 WA0014 scaled Mission Nirbhaya : मिशन निर्भया अंतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन

सदरचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बद्दल व्हावा या उद्देशाने आपण नांदेड जिल्हा पोलीस दलाकडुन शाळा/ कॉलेज मध्ये जावून जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सदर उपक्रमाच्या अनुषंगाने दिनांक 09.07.2025 रोजी इंदिरा गांधी हायस्कूल सिडको, नांदेड येथे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, पोलीस उपनिरीक्षक मारोती चव्हाण, पोको काशीनाथ कारखेडे यांनी अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, नैतिकता, वाहतूक सुरक्षा, सेल्फ डिफेन्स, कायदे विषयक जनजागृती (शस्त्र अधिनियम, ईव्ह टीजिंग रॅगिंग), गुड टच, बेंड टच, तसेच सायबर जनजागृती, सोशल मिडीया वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाईन कंप्लेट करिता QR कोड चे वाटप देखील करण्यात आले आहेत.

सदर कार्यक्रमास पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, पोलीस उपनिरीक्षक मारोती चव्हाण, पोकों/काशीनाथ कारखेडे, नेमणूक सायबर पोलीस ठाणे, इंदिरा गांधी हायस्कूल सिडको, नांदेड येथील शाळेचे मुख्याध्यापक डॉ. गरड व इतर शिक्षकवृंद असे उपस्थित होते. सदरचा उपक्रम नांदेड जिल्हयातील विविध शाळेत घेण्यासाठी पोलीस निरीक्षक वसंत सप्रे मो.नं. 8425840431 व मारोती चव्हाण पोलीस उपनिरीक्षक मो. नं. 9552512510 नेमणूक सायबर पोलीस स्टेशन नांदेड यांच्याशी संपर्क करण्याबाबत अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आवाहन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments