Sakal Maratha Samaj : राज्यस्तरीय नियोजन बैठकीला नांदेडवरून हजारो मराठे जाणार – सकल मराठा समाज नांदेड

नांदेड| मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चलो मुंबई ची हाक देणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून 29 जून रोजी अंतरवाली सराटी येथे राज्यस्तरीय नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे, करिता सदरील बैठकीला नांदेड येथून हजारो मराठे जाणार असल्याचा दृढ निश्चय आजच्या बैठकीत सकल मराठा समाजाकडून करण्यात आला आहे.


जरांगे पाटील यांनी चलो मुंबई ची हाक दिली असुन येत्या 29 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा करोडो मराठे खालील मागण्यासाठी मुंबई जाण्यासाठी प्रचंड ताकतीने तयारीला लागले आहेत,त्या तयारीसाठी राज्यभरातील गावागावात तालुक्यात आणि जिल्ह्यात सुद्धा बैठका जोरात चालु झाल्या आहेत आणि त्यात सुद्धा जरांगे पाटील यांनी एक *राज्यस्तरीय निर्णायक बैठक* 29 जुन रोजी अंतरवाली सराटी येथे बोलावली असुन त्याच अनुषंगाने, सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने आज नांदेड शहरातील हनुमान मंदिर मंगल कार्यालय येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली व 29 जुन च्या राज्यस्तरीय बैठकीला नांदेड वरून हजारो समाज बांधव जाण्याचे नियोजन करण्यात आले.

यावेळी मुदखेड, कंधार, लोहा, नायगाव, बिलोली, हदगांव, उमरी, भोकर यासह नांदेड दक्षिण व उत्तर तालुक्यातील मराठा सेवक बैठकीला उपस्थित होते, सर्वांनी मिळून समाजातील तळागाळातील समाज बांधवापर्यंत जरांगे पाटील यांचा विचार रुजवून समाजाला नवचेतना देण्याचे काम करू व मुंबई कुच करण्यासाठी लाखों मराठा बांधवाना आपल्या हक्काच्या आरक्षणाची जाणीव करून देत या सरकारसोबत दंड थोपटण्यासाठी तयार करू असा निश्चय केला व खालील मागण्यासाठी नांदेड जिल्हा हा कायम जरांगे पाटलासोबत असेल असा विश्वास सुद्धा यावेळी व्यक्त केला.



प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश तात्काळ लागू करावा. हैद्राबाद, सातारा, व बॉम्बे गॅझेटियर लागू करून त्यावर अंमलबजावणी करावी. “सगे-सोयरे” अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी. मराठा आरक्षणातील आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत. मराठा आंदोलनातील बलिदान दिलेल्या कुटुंबांना नोकरी व आर्थिक मदत द्यावी. मा.न्या. शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी. संतोष अण्णा देशमुख हत्या आणि कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी.
जर हे निर्णय १ ऑगस्ट २०२५ पर्यंत घेण्यात आले नाहीत, तर २९ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या प्रमाणात मुंबईत आंदोलन करण्याचा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला आहे व सदरील आंदोलनाला सकल मराठा समाज, नांदेड जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देत नांदेड वरून लाखों मराठा समाज या आंदोलनात सहभागी होईल व जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाहीत असा खमखमित ईशारा सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आला. सदरील बैठकीला असंख्य मराठा सेवक उपस्थित होते.




