Nanded ; हस्तांतरण प्रक्रीया समितीच्या मार्फत तिनं महिन्याचा आत काढावी, शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे मागणी

IMG 20250625 WA0001 Nanded ; हस्तांतरण प्रक्रीया समितीच्या मार्फत तिनं महिन्याचा आत काढावी, शिवसेना ऊबाठा गटाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदनाद्वारे मागणी

नवीन नांदेड l सिडको घर हस्तांतरण प्रक्रिया 3 महिण्यात निकाली काढण्या यावी याबाबत स्थापन केलेल्या समिती विषयी स्मरणपत्र जिल्हाधिकारी नांदेड येथे शिवसेना ऊबाठा गटांचे जिल्हा प्रमुख भुजंगराव पाटील डक,महानगर प्रमुख मनोज यादव, सिडको शहर संघटक प्रमोद मैड व पदाधिकारी, शिवसैनिक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सिडको मुळ घर मालकांच्या अनुपस्थितीमध्ये घरांचे हस्तांतर त्रिसदस्य समिती सरकारने नेमण्यात आलेली आहे,(ज्यात जिल्हा अधिकारी, महानगरपालिका आयुक्त व सिडको मुख्य प्रशासक अशी ही समिती) या समितीने तीन महिण्याचा कालावधीमध्ये निर्णय शासनाला कळवावे असं सांगण्यात आले आहे. पण आज घडीला ही समिती काम करताना दिसत नाही, त्यामुळे या समितीने तातडीने सरकारला आपला अहवाल कळवावा, आम्ही शिवसैनिकांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आहे.

तेंव्हा या समितीने आम्हाला देखील विचारात घ्यावे, तसेच क्रमांक एकचा मुद्दा याआधी सिडकोकडे कुठलीही रजिस्ट्री पध्दत नव्हती. त्यामुळे हे घरं लोकांना बॉण्ड पेपर घेतले व त्यानंतर सिडकोने 92 झिरो पाच ठराव मंजुर करुन असे घर थर्ड पार्टी म्हणून त्या काळात त्यांनी त्या लोकांना न्याय मिळेल हा प्रश्न सिडको छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड सिडकोच्या धर्तीवर आहे.

म्हणून या समितीने याकडे लक्ष वेधले पाहिजे अशी संपूर्ण नागरिकांची अपेक्षा आहे. या निवेदना सोबत काही कागदपत्र जोडलेले आहेत.कागदपत्र पाहून आपण जी पहिली पध्दत होती त्या पध्दतीने थर्ड पार्टी पध्दतीने घरे त्या लोकांच्या नावावर करुन द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना ऊबाठा गटांचे उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण तालुकाप्रमुख नंदू वैद्य माजी शहर प्रमुख निवृत्ती जिंकलवाड पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top