Dr. Basna Goud : फळबागेची शेती फायदयाची ठरण्यासाठी खात्रीशीर, निरोगी रोपांची निवड आवश्यक – आयसीआरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बसना गौड
लातूर| फळबागेची शेती फायदेशीर ठरायची असेल तर त्यासाठी रोपांची निवड अत्यंत महत्वाची ठरते त्यामुळे खात्रीशीर आणि निरोगी रोपाची लागवड करावी असा सल्ला सोलापूर येथील राष्ट्रीय डांळीब संशोधन केंद्र येथे कार्यरत असलेले आयसीआरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बसना गौड यांनी दिला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने लातूर येथील मांजरा चॅरीटेबल संचलीत कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून लातूर जिल्हयात २९ मे ते १२ जून दरम्यान विकसीत कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. सोलापूर येथील डांळीब संशोधन केंद्रातील वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रामनिवास (फळबाग), डॉ.बसना गौड (किटकशास्त्र), डॉ.चंद्रकांत औवचारे (फळबाग) आणि डॉ. मल्लीकार्जून एच (किटकशास्त्र) यांच्यासह मांजरा कृषी संशोधन केंद्रातील डॉ. संदीप देशमुख व त्यांचे सहाकारी सदरील अभियानाअंतर्गत संपूर्ण जिल्हयातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीच्या संदर्भाने मार्गदर्शन करीत आहेत.


संशोधकांच्या या शिष्टमंडळाने नुकतीच माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील शेतीला भेट देऊन तेथील खजूर आणि ड्रॅगन फ्रुट लागवडीची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी आमदार अमित देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी भेट दिली. या प्रसंगी विलास कारखान्याचे व्हा.चेअरमन वैजनाथराव शिंदे, टवेटिवन शुगर्सचे उपाध्यक्ष विजय देशमुख, जनरल मॅनेजर संतोष बिराजदार, जनसंपर्क अधिकारी पांडूरंग कोळगे व शेतकी विभागातील अधिकरी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

या प्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ. बसना गौडा म्हणाले की, ऊस व इतर बागायती शेतकऱ्यांनी शेती वयवसायाला जोड व्यवसाय म्हणून बांधावर व मोकळया जागेत फळझाडाची लागवड केल्यास त्यांना अतिरीक्त उत्पन्न् मिळू शकते. त्यांना या झाडापासून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर रोपाची निवड
करतांना विशेष काळीज घ्यावी लागेल असेही त्यांनी सांगीतले. मध्यत्तरी तेल्या रोगामुळे डांळीब उत्पान्नात घट झाली होती परंतु आता संशोधनातून तेल्या रोगांवर मात करणारी रोपे तयार झाली आहेत. फक्त डांळीबच नव्हे तर इतर फळाची रोपेही संशोधित वानाची रोपे खात्रीशीर ठीकाणाहून खरेदी करावीत असे त्यांनी सांगीतले.


वर्षात १५० मीली मीटर पाऊस पडणाऱ्या राजस्थानमध्ये खजूर आणि ड्रगनफ्रुटची शेती फायदयाची ठरत आहे. ७५० मीली मीटर पाऊस पडणाऱ्या लातूर जिल्हयात तर या फळझाडाची लागवड राजस्थानपेक्षाही अधिक फायदयाची ठरणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करुन फळबाग लागवडीचा पर्याय निवडावा त्यासाठी शासनाचा कृषी विभाग, साखर कारखान्याचा कृषी विभाग यांनी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे असे आवाहन डॉ. रामनीवास यांनी यावेळी केले.

प्रारंभी संपर्क कार्यालयात सर्वच शास्त्रज्ञाचे व्हा. चेअरमन वैजनाथराव
शिंदे, टवेटिवन शुगर्सचे उपाध्यक्ष विजय देशमुख, जनरल मॅनेजर संतोष
बिराजदार, जनसंपर्क अधिकारी पांडूरंग कोळगे यांनी स्वागत केले. तर
सुत्रसंचालन राहूल पाटील यांनी केले.
—



