Tuesday, May 19

Mla. Prataprao Patil Chikhlikar : वंदे भारत एक्सप्रेस नांदेड येथून धावणार: आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला होता पाठपुरावा

नांदेड| मुंबई येथे जालना धावणारी वंदे भारत एक्सप्रेस नांदेड येथून सुरू व्हावी यासाठी तत्कालीन खासदार आणि विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रयत्न केले होते. अखेर या प्रयत्नाला यश आले असून आता लवकरच वंदे भारत एक्सप्रेस नांदेड येथून मुंबईसाठी धावणार आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार तथा लोहा कंधार विधानसभा मतदान मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तत्कालीन परिस्थितीत वंदे भारत एक्सप्रेस नांदेड इथून सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. गृहमंत्री अमित शहा हे नांदेड भेटीवर आले असता त्यांच्या कडेही त्यांनी मागणी केली होती आणि विराट सभेत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नावाचा उल्लेख करत अमित शहा यांनी नांदेड येथून विमानसेवा आणि वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होईल असे आश्वासन दिले होते तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या अनुषंगाने चिखलीकर यांनी पाठपुरावा केला होता.

अखेर या पाठपुराव्याला यश आले असून, आता लवकरच नांदेड येथून वंदे भारत एक्सप्रेस मुंबईसाठी सुरू होणार आहे . या रेल्वेमुळे नांदेडच्या विकासाला नवी गती प्राप्त होईल आणि नांदेडकरांना जलद गतीचा प्रवास करून मुंबईला लवकर पोहोचता येईल. वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पर्यंत सोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आ.चिखलीकर यांनी आभार मानले आहेत. दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस नांदेड पासून सुरु व्हावी यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचेही आमदार चिखलीकर यांनी ऋण व्यक्त केले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!