Homeनांदेडdarkness in four villages : पेनुर विद्युत उपकेंद्र ठप्प; चार गावांत चार...

darkness in four villages : पेनुर विद्युत उपकेंद्र ठप्प; चार गावांत चार दिवसांपासून अंधार; ४५ कामगार फिल्डवर

लोहा| लोहा शहर व परिसरात ९ तारखेला झालेल्या वादळी मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका वीज महावितरण विभागाला बसला आहे. लोहा सब स्टेशन सुरळीत झाल्यानंतर वीज महावितरण यंत्रणा पेनुर उपकेंद्राकडे वळली असून सोमवार रात्री पासून पेनुर अंतेश्वर भरसवाडा, चित्रवाडी ही चार गावे अंधारात आहेत. १२ विद्युत पोल तुटून पडले लाईन शेतातून असल्याने आणि काळ्या मातीचे रान व त्यात पाऊस त्यामुळे खांब उभे करण्यासाठी फार अडचणी येत आहेत. या विभागाचे व कंत्राटदार याचे मिळून ४५ कामगार गेल्या तीन दिवसा पासून वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. कार्यकारी अभियंता आर पी चव्हाण व टीम चिखलाची पर्वा न करता फील्डवर असून लवकरच या गावात वीज पुरवठा सुरळीत होणार आहे.

IMG 20250610 WA0092 darkness in four villages : पेनुर विद्युत उपकेंद्र ठप्प; चार गावांत चार दिवसांपासून अंधार; ४५ कामगार फिल्डवर

लोहा शहर व तालुक्यात ९ जून सोमवारी वादळी मुसळधार पाऊस झाला. त्याचा फटका वीज महावितरणला बसला असून, लोह्यात १५ तासांच्या प्रयत्ना नंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. तर याच दिवशी पेनुर ३३ के व्ही उपकेंद्र पेनुर ला जाणाऱ्या वाहिनीचे वादळी वाऱ्यात व पावसा मुळे १२ पोल पूल तुटून पडले. त्यामुळे हे उपकेंद्र पूर्णपणे बंद पडले आहे. त्यावरील चार ११ के व्ही विद्युत वाहिन्या बंद झाल्या 12 ते 14 गावाचा निधी पुरवठा ठप्प झाला आहे. चार दिवसा पासून अंधार असलेल्या गावातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा. यासाठी कार्यकारी अभियंता आर पी चव्हाण स्वतः दुचाकीवर चिखलातून मार्ग काढत फिल्डवर जात आहेत.

लोहा विभागाचे उपकार्यकारी अभियंता, एन. के. सुतार, शहर अभियंता श्री स्वामी, पेनुरचे अभियंता श्री. इंगळे इंजि. दिनेश अमृतकर ही अभियंता टीम वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून परिश्रम घेत आहे. बाबु पवार, सुरकुंठवार, नितीन कांबळे, पांडु सामे दिलीप राठोड सर्व जनमित्र.लाईट ऑफिसचे कामगार तसेच कंत्राटदार थोरात व त्याचे मजूर अशी टीम यासाठी अथक मेहनत घेत आहेत.

IMG 20250610 WA0095 darkness in four villages : पेनुर विद्युत उपकेंद्र ठप्प; चार गावांत चार दिवसांपासून अंधार; ४५ कामगार फिल्डवर

या भागात काम अत्यंत तातडीने करण्यासाठी महावितरणने कार्यवाही त्याच दिवसा पासून सुरू केली. परंतु त्या ठिकाणी पाऊस व काळीची जमीन असल्यामुळे अडचण आली शिवाय वीज लाईन रस्त्या लागत नसल्याने महावितरणची खरी कसोटी सुरू झाली. पण वीज विभागाने अडचणींवर मात करत चिखलातून मार्ग काढत त्या अधिक मनुष्यबळ घेऊन खांद्यावर अर्धा ते एक किलोमीटर लोखंडी पोल नेऊन ते उभे करण्याचे काम चालू आहे. परंतु पोल उभे करत असताना त्या ठिकाणी त्या खड्ड्यात पाणी येत असल्यामुळे विलंब होत आहे.पण लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात आले.

पेनुर, अंतेश्वर, चित्रावाडी, भारसवाडा. अंधारात
पेनुर सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पेनुर, अंतेश्वर, चित्रावाडी, भरसावडा या चार गावात गेल्या चार दिवसा पासून अंधार आहे. वादळी वारा व मुसळधार पावसाचा फटका वीज मंडळाला बसला आहेत शेतातून वीज प्रवाहित तारा गेल्या आहेत. १२ पोल तुटून पडले ते उभे करताना मोठा त्रास कामगारांना होतो आहे.

दीड घरगुती वीज पुरवठा बंद
चार गावे चार दिवसा पासून अंधारात आहेत बिहारी मजूर सोबत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून पोल शेतात नेले जात आहेत. खड्डे खंदताना पाणी लागत आहेत पाऊस पडत आहेत. त्यामुळे पुन्हा पोल उभे करताना वीज कामगारांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. १५००घरगुती वापराचे व 1200 शेतीपंप असे २ हजार ७०० ग्राहकाचा विज पुरवठा बंद आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments