HomeकृषीFarmers are upset : आयडीबीआय बँकेच्या भोंगळ कारभाराला शेतकरी वैतागला

Farmers are upset : आयडीबीआय बँकेच्या भोंगळ कारभाराला शेतकरी वैतागला

देगलूर, गंगाधर मठवाले | तालुक्यातील मौजे शहापूर येथील आयडीबीआय बँकेत शेतकरी सोने तारन ठेवून कर्ज उचलून सोयाबीन व खते आणण्यासाठी गेले असता सोन्याची पारक करणारा, वजन करणारे सावकार नसल्याने तूमचे कर्ज होत नाही. दुसऱ्या बँकेत जाऊन कर्ज उचला असे आयडीबीआय बँकेचे मुजोर व्यवस्थापक शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत. बैंक अधिकाऱ्याच्या या भोगळ कारभाराला शेतकरी वैतागला असून, तात्काळ येथील अधिकाऱ्याची उचबागडी करून सोने पारक करणारा दुसरा व्यक्तीची नेमणूक करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

शहरापुर येथील आयडीबीआय बँकच्य शाखा व्यवस्थापकी पदी चौधरी यांनी पदभार हाती घेतल्यापासून कायम शेतकऱ्यांची उपेक्षाच होत आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेले अधिकारी आता शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज देण्यासाठी चालढकल करत आहेत. व्यापारी, आडत, बिरबार, दुकानदार, हॉटेल, आशा लोकांनी बँकेत सरळसरळ व्यवहार करतात. मटार शेतकरी कर्ज मागणी करुन देखील जानुन बूजून दुर्लक्ष केले जात आहे.

गेल्या वर्षी पिक कर्ज साठी टाकलेले अर्ज आजही मजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे भोळे भाबडे शेतकरी चकरा मारुन वैतागून बँकेतन जाणेच बंद केले आहे. सहा महिने पुर्वी संभाजी नगरचे अधिकारी शहापूर बँकेत आले असता गावकर्यांनी या मुजोर व्यवस्थापकाचा पाडा वाचल्यानंतर काही शेतकऱ्यांना बोलावून कर्ज देण्यात आले.

सध्या तरी आयडीबीआय बँक असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झालेली दिसत आहे. त्यामुळे शेतकरी सोन गहाण ठेऊन कर्ज घेण्यासाठी येत असताना देखील शाखाधिकारी सोन्याची पारक करणारा, वजन करणारे सावकार नसल्याने कारण सांगून शेतकऱ्यांना परत पाठवत आहे. वरिष्ठनी याची दखल घेऊन सोने पारक करणारा दुसऱ्या व्यक्तीची तत्काळ निवड करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. चौधरी यांनी बँकेचे व्यवहार हाती घेतल्यानंतर व अगोदरच्या काळात चौकशी करून शहापूर येथील आयडीबीआय बँक शाखेतून त्यांची उचल बागडी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments