HomeनांदेडNanded ; नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची धडक कामगिरी ,अवघ्या दोन तासात...

Nanded ; नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची धडक कामगिरी ,अवघ्या दोन तासात चोरीचा गुन्हा उघड करुन आरोपीस मुद्देमालासह अटक

नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या रहिमपुर दूध डेअरी नांदेड येथील शैख मौला शेख मोहम्मद यांच्या मुलींची प्रकृती ठिक नसल्याने घाईगडबडीत मुलीस व घरच्या घेऊन रूग्णालयात उपचारासाठी नेले असता घराचे दार उघडे असल्याचे पाहून अज्ञाताने घरात ठेवलेले 1,71,हजारांचे सोन्याच्ये दागिने चोरून नेल्याची घटना घडल्या नंतर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण व पथकाने तात्काळ दोन तासांच्या आत या घटनेतील आरोपी यास अटक करून मुद्देमाल जप्त केला असुन आरोपीस अटक केली आहे ‌.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार,पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शना खाली‌ अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड,सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, इतवारा यांच्या मार्गदर्शना खाली ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण व पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण, पोहेकों/प्रमोद कराहाळे, पोकों/विठ्ठल भिसे, पोकॉ संघरत्न गायकवाड, पोकॉ/संजय शिरगीरे, पोकों/शंकर माळगे नेमणुक पो.स्टे. नांदेड ग्रामीण यांनी सदरील गुन्हा उघडकीस आणला असुन आरोपी सय्यद मोहम्मद सय्यद इस्माईल वय 3। वर्ष, रा. रहिमपुर ता.जि नांदेड यांना अटक करून
जप्त मुद्देमाल सोन्याचे दागीने किंमती 1,71,500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

IMG 20250610 WA0022 scaled Nanded ; नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची धडक कामगिरी ,अवघ्या दोन तासात चोरीचा गुन्हा उघड करुन आरोपीस मुद्देमालासह अटक

या प्रकरणी मिळालेल्या माहिती नुसार अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल चोरी, घरफोडी, दरोडा सारखे गुन्हे उघडकीस आणने बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.फिर्यादी शेख मौला पि. शेख मोहम्मद रा. इब्राहिम मजिस्द जवळ रहिमपुर दुध डेअरी समोर नांदेड यांनी दिनांक 08 जुनं रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे तक्रार दिली की, दिनांक 06 जुनं 25 रोजी त्यांच्या मुलीची प्रकृती ठिक नसल्याने ते घाईगडबडीत मुलीस व घरच्यांना घेवून अपेक्षा हॉस्पीटल येथे गेले असता त्यांचे घराचे दार उघडे असल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात ठेवलेले सोन्याचे दागिने किमंती 1,71,500 रुपयाचे कोणीतरी चोरुन नेले आहे.

वगैरे तक्रारी वरुन नमुद दाखल गुन्ह्यात ओमकांत चिचोलकर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करुन गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासाच्या आत पोस्टे हद्दीतील संशयित इसम नामे सय्यद मोहम्मद सय्यद इस्माईला रा. रहिमपुर यास ताब्यात घेवून त्याचेकडे तपास करुन गुन्ह्याची उकल करुन त्याच्याकडून गुन्ह्यातील गेलामाल सोन्याचे दागिणे किंमती 1,71,500/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

वरील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीचे अबिनाश कुमार, पोलीसा अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments