कृषीनांदेडव्हिडीओ

Cyclone hits Himayatnagar city area : हिमायतनगर शहर परिसराला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ; शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान

हिमायतनगर, अनिल मादसवार। शहर व तालुका परिसरातील अनेक गावाना सोमवार दिनांक 9 च्या रात्री झालेल्या चक्रीवादळासह पावसाचा जबरदस्त फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. चक्रीवादळाने शेकडो झाडे उन्मळून व तुटून पडल्याने हिमायतनगर येथील रेल्वेस्थानक, शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्ता आणि खडकी पांदण रस्ता तासंतास विस्कळीत झाला होता, तर अनेक झाडे महावितरणच्या विद्दुत खांब आणि, तारांवर पडल्याने महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाले असून, तर अनेक घरांची पडझड होऊन वीजपुरवठा खंडित झाल्याने हिमायतनगर शहर व तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना अंधारात रात्र जागून काढावी लागली आहे.

IMG 20250610 133109 Cyclone hits Himayatnagar city area : हिमायतनगर शहर परिसराला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ; शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान

IMG 20250610 073338 Cyclone hits Himayatnagar city area : हिमायतनगर शहर परिसराला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ; शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान

शहर व तालुका परिसरात सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारापासून चक्रीवादळ सदृश्य वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांची एकच धावपळ झाली होती, अनेकांच्या घरावर टिनपत्रे उडून गेली असून, पावसामुळे जिवनउपयोगी साहित्य भिजून गेले आहे, तर शेकडो झाडे जमीनदोस्त झाली असून, वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक धास्तावले होते. वादळी वारे विजांचा कडकडाट, पावसाची धुंवाधार, चक्रीवादळा सारख्या परिस्थितीमुळे अनेकांच्या उरात धडकी भरली होती. वादळी वाऱ्याचा खेळ तासाभर चालला असून, अनेक शेतकऱ्यांनी मृगाचा पाऊस वेळेवर होणार असल्याने शेतातील आखाड्यावर खत, बी बियाणे नेऊन पेरणीची पूर्वतयारी केली होती, मात्र प्रचंड वादळी वारे व विजांच्या कडकडाटसह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेड व टिनपत्रे उडून गेल्याने बियाण्यासह, वैरण भिजून मोठे नुकसान झाले आहे.

IMG 20250610 083416 Cyclone hits Himayatnagar city area : हिमायतनगर शहर परिसराला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ; शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान

IMG 20250610 072237 Cyclone hits Himayatnagar city area : हिमायतनगर शहर परिसराला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ; शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान

एव्हढंच नाहीतर शहर व परिसरातील अनेकांच्या घरांची पडझड झाली असून, गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत, हिमायतनगर शहरातील श्याम ठाकरे यांच्या घराच्या छतावरील कामाऊंड वॉल रस्त्यावर कोसळली सुदैवाने येथे कोणीही नसल्याने मोठी हानी टळली, तर रुखमाबाई रामा मनमंदे यांच्या घरावरील टिनपत्रे भिंत ढासळून कोसळून मोठं नुकसान झाले असून, त्यांचा घरसंसार उघड्यावर आला आहे, शहरातील सय्यद बिलाल चातारकर यांच्या घरावर झाड कोसळले यात मोठं नुकसान झाले आहे, सुदैवाने बाथरूमला गेलेल्या मुलं नेमकेच बाहेर आल्याने बालबाल बचावले आहेत. यासह अनेक छोट्या मोठ्या घरांची पडझड झाली असून, शासनाने पंचनामे करून मदत घ्यावी अशी मागणी केली जाते आहे. एकूणच वादळी वाऱ्याचे उग्ररूप पाहून अनेकांची झोप उडाली होती.

IMG 20250610 085135 Cyclone hits Himayatnagar city area : हिमायतनगर शहर परिसराला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ; शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान

IMG 20250610 133210 Cyclone hits Himayatnagar city area : हिमायतनगर शहर परिसराला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ; शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान

हिमायतनगर शहरातील युवा शेतकरी प्रवीण मामीडवार यांच्या शेतातील जणावरे बांधण्याचा गोठ्यावर महाकाय वृक्ष कोसळले असून, सिमेंट कोंकरेटमध्ये करण्यात आलेले शेड कोसळून पडले, तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील टिनपत्रे उडून गेली आहेत, शेड थेट जनावरांच्या गोठ्यावर पडल्याने रात्री 11 वाजेच्या अथक प्रयत्न करून शेडमध्ये अडकलेल्या जनावरांना बाहेर काढण्यात यश आले आहे, यात काही जनावरे जखमी झाले असून, त्यांच्याच शेतीतील 12 फूट उंच असलेल्या शेकडो केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत, झाडांना मोठ्या प्रमाणावर लगडलेली केळीची घड देखील तुटून पडल्याने केळीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, एकूणच शेतकऱ्यांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला असून, हिमायतनगर शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांचे कमी अधिक मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी केली जाते आहे.

IMG 20250610 084044 Cyclone hits Himayatnagar city area : हिमायतनगर शहर परिसराला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ; शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!