HomeनांदेडChhatrapati Sambhaji Nagar - Parbhani railway line cleared : छत्रपती संभाजी नगर...

Chhatrapati Sambhaji Nagar – Parbhani railway line cleared : छत्रपती संभाजी नगर – परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी

नांदेड| दक्षिण मध्ये रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा मार्ग आता मार्गी लागणार आहे . यासाठी जमीन अधिग्रहणाचे अध्यादेश केंद्र सरकारकडून काढण्यात आलेले आहेत . खा. डॉ. अजित गोपछडे यांच्यासह नांदेड व मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांच्या वतीने अनेक वेळा निवेदने देऊन आंदोलन करण्यात आले होते .अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे.

दक्षिण मध्य रेल्वे विभागातील जवळजवळ सर्वच मार्गांच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे . अनेक भागातील रुंदीकरणाचे कामही पूर्ण झालेले आहे. सिकंदराबाद ,विजयवाडा , गुंतकल , हैदराबाद , गुंटूर आणि नांदेड अशी एकूण सहा विभाग असलेल्या दक्षिण मध्य रेल्वे विभागातील नांदेड, पूर्णा ,परभणी ,जालना आणि छत्रपती संभाजी नगर या प्रमुख पाच रेल्वे स्थानकाचा समावेश नांदेड विभागात आहे .

railway Chhatrapati Sambhaji Nagar - Parbhani railway line cleared : छत्रपती संभाजी नगर - परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी जमीन अधिग्रहणाचा प्रश्न मार्गी

नांदेड ते छत्रपती संभाजी नगर मार्गावरून दैनंदिन जवळजवळ 50 प्रवासी रेल्वे आणि मालगाड्या आवागमन करत असतात . या विभागातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते . परंतु छत्रपती संभाजी नगर ते परभणी या 177.29 किलोमीटरच्या अंतराचे दुहेरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते . बहुतांश मार्गांचे दुहेरीकरण झाले असल्याने रेल्वे प्रवास सोपा आणि लवकर होतो परंतु या १७७ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव भिजत पडल्याने रेल्वे प्रवासाचा कालावधी कायम लांबलेला आहे.

या परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि पंतप्रधानांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता . त्यासाठी मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी आणि रेल्वे संघर्ष समितीसह विविध संघटनानी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून आता छत्रपती संभाजी नगर ते परभणी दुहेरीकरणसाठी आवश्यक असणारी जमीन अधिग्रहण प्रक्रिया करण्यासाठी केंद्र शासनाने अधिसूचना जारी केलेली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments