Wednesday, May 13

former minister MLA Amit Deshmukh : माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या आवाहनानंतर काँग्रेस पदाधिकारी, प्रशासनासह लातूरकरांच्या मदतीला

लातूर| लातूरमध्ये मान्सूनपूर्व अतिवृष्टीने घरांमध्ये पाणी शिरले, रस्ते जलमय झाले. अशा संकटाच्या काळात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या आवाहनाने लातूरकरांना दिलासा मिळाला. त्यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख आणि प्रशासकीय कर्मचारी नागरिकांच्या मदतीला धावले, त्यांनी एकजुटीने मदतकार्य सुरू केले. स्वच्छता अभियान, पंचनामे आणि प्रशासनासोबतच्या समन्वयामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लातूर शहर व परिसरात काल (मंगळवार, २७ मे) दुपारनंतर झालेल्या मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहराच्या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, तर रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत होते. अनेक खोलगट भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

या पार्श्वभूमीवर, राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तातडीने जिल्हा प्रशासन आणि महापालिका यंत्रणेला नागरिकांची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच, त्यांनी लातूर शहरातील सर्व माजी नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ प्रमुख यांना आपापल्या परिसरात नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे कळकळीचे आवाहन केले होते. आमदार देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, आज बुधवार दि. २८ मे रोजी दिवसभर लातूर शहरातील सर्व माजी नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष, प्रभाग निरीक्षक, बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते व कार्यलयीन प्रभाग समन्वयक कर्मचारी यांनी मान्सुनपुर्व पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्यासाठी मदत केली. त्यांनी लातूर शहरातील सर्व १८ प्रभागात आणि २७ गावांमध्ये नागरिकांना तसेच प्रशासनाला झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मदत करण्यात येत आहे. मनपा आणि ग्रामपंचयातच्या मदतीने स्वच्छता, साफसफाई, नालेसाफसफाई मोहीम राबवली जात आहे.

P 4.1 former minister MLA Amit Deshmukh : माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या आवाहनानंतर काँग्रेस पदाधिकारी, प्रशासनासह लातूरकरांच्या मदतीला

यामध्ये आज बुधवार दि. २८ मे २५ रोजी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रशानाच्या मदतीने नागरीकांना मदत केली. लातूर शहरातील तेली गल्ली, जुना औसा रोड, बांधकाम भवन परीसर, शास्त्री नगर, अजम नगर, इस्लामपूरा, खाडगावरोड परीसर, लक्ष्मी कॉलनी, श्रीराम चौक, दादोजी कोंडदेव नगर, अक्षरधाम कॉलनी, उस्मानपूरा, अन्सार कॉलनी, विलासनगर, साळे गल्ली, सिध्देश्वर वेस परीसर, गावभाग, ६० फुट रोड परीसर, सिध्दार्थ सोसायटी, मोहन नगर, ताजोददीनबाबा नगर, एकमिनार मश्जिद परीसर, जयनगर, हत्तेनगर, नांदेडनाका परीसर, वैशालीबौध्द वीहार परीसर, बौध्दनगर, विठठल रुक्मणीनगर, रामरहीम नगर, केशव नगर, देशपांडे गल्ली, आझाद चौक, खडक हनुमान, प्रकाश नगर, विजयनगर, झीनत सोसायटी भैय्यासाहेब नगर, बालाजी नगर, अंजली नगर, ऊस्मानपूरा, दिनानाथ नगर, गॅलक्सी हॉस्पिटल, खोरी गल्ली, अयोध्या नगर, महाराणा प्रतापनगर, प्रबुद्ध नगर, अंजली नगर या भागात विशेष करुन नागरीक आणि प्रशासनाला मदत केली. १५ मधील सर्व २ मोठे आणि ११ छोटे नाले यांची जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छता करण्यात आली. याकामात उपआयुक्त, क्षेत्रीय अधिकारी, मुख्य स्वच्छता अधिकारी, मनपा स्वच्छता निरीक्षक तसेच मनपा स्वच्छता विभागाचे कर्मचारी सक्रीय राहीले.

Village 1 former minister MLA Amit Deshmukh : माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या आवाहनानंतर काँग्रेस पदाधिकारी, प्रशासनासह लातूरकरांच्या मदतीला

या सर्व कामाचे नियोजन मदत करण्यासाठी ॲड. किरण जाधव, ॲड. समद पटेल, ॲड. दिपक सुळ, सचिन बडडापले, अहमदखा पठाण, सागर मुसाडे, प्रविण घोटाळे, विजयकुमार साबदे, फारुख शेख, दगडूअप्पा मिटकरी, प्रविण सुर्यवंशी, युनुस मोमीन, तबरेज तांबोळी, सुमीत खंडागळे, कैलास कांबळे, अहमदखा पठाण, विजय गायकवाड, रवीशंकर जाधव, पंडीत कावळे, सपना किसवे, गाजी पठाण, धनजंय शेळके, गोरोबा लोखंडे, आयुब मणियार, पप्पू देशमुख, पुनीत पाटील, संगीता कस्पटे, कुणाल वागज, अतिक बासले, राजेश कासार, निमीन स्वामी, असिफ बागवान, पिराजी साठे, नितीन कांबळे, इम्रान सय्यद, प्रा.संजय जगताप, राज क्षिरसागर, असलम शेख, अभिषक पतंगे, विष्णूदास धायगुडे, मुन्वर शेख, अरिफ शेख, फारुक शेख, पवन गायकवाड, अमजद शेख, मंदीप सवई, राजू गवळी, अमोल गायकवाड, नवाब शेख, अशुतोष मुळे, अजय वाघदरे, नजीर शेख, बबन शिंदे, समिर पठाण, संतोष जाधव, रफीक शेख, आदीनी केली आहे. या मदतीमुळे नागरिकांना दिलासा मिळत असून, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संकटकाळात केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!